Sugar Season Maharashtra
Sugar Season Maharashtraagrowon

Sugar Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात

Sugarcane Crushing Season : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. एप्रिलअखेर देशात ३१५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले.

Kolhapur News : देशातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. एप्रिलअखेर देशात ३१५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. गेल्या वर्षीपेक्षा साखरेचे उत्पादन काहीसे कमी असले, तरी उताऱ्यात मात्र गेल्या वर्षीपेक्षा आघाडी आहे.

राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने दिलेल्या माहितीनुसार, देशात ३१२९ लाख टन उसाचे गाळप झाले. १०.९ टक्के साखर उताऱ्याने ३१५ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. साखर हंगामाच्या अंतिम टप्प्यातील महाराष्ट्रच आघाडीवर असल्याचे चित्र आहे. महाराष्ट्राचा हंगाम संपला आहे. केवळ दोनच कारखाने सुरू आहेत.

Sugar Season Maharashtra
Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

महाराष्ट्रात एप्रिल अखेर १०९ लाख टन साखरेचे उत्पादन झाले. या खालोखाल उत्तर प्रदेशमध्ये १०३ लाख टन उत्पादन झाले. कर्नाटक साखर उत्पादनाच्या तिसऱ्या क्रमांकावर आहे. कर्नाटकातील हंगाम पूर्णपणे संपला आहे.

कर्नाटकात लाख टन साखरेचे उत्पादन झाले. देशात यंदा ५३४ साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केला होता. या पैकी ५११ साखर अद्याप बंद झाले आहेत. उत्तर प्रदेशात सर्वाधिक १३ साखर कारखाने सुरू आहेत.

गेल्या वर्षी या कालावधीत ३२१ लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते. या वर्षी १०.०९ टक्के साखर उतारा आहे. गेल्या वर्षी साखर उतारा ९.८७ टक्के होता. विशेष करून उत्तर प्रदेश व महाराष्ट्रात यंदा साखर उताऱ्यात वाढ झाली. नोव्हेंबरमध्ये झालेल्या पावसामुळे हंगामाच्या शेवटी शेवटी साखर उतारा वाढला.

Sugar Season Maharashtra
Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

उत्तर प्रदेशात १३ कारखाने सुरू

देशातील हंगाम आणखी पंधरा दिवस चालण्याची शक्यता आहे. तमिळनाडूतील आठ कारखाने ही अद्याप सुरू आहेत. उत्तर प्रदेशचा हंगाम सर्वात शेवटी संपेल अशी चिन्हे आहेत. या राज्यात अद्याप १३ कारखाने सुरू आहेत.

महाराष्ट्रात जादा साखर उत्पादन

साखर उत्पादनाबाबत हंगामाच्या प्रारंभीचा महाराष्ट्र राज्याबाबतचा अंदाज चुकला आहे. राज्यात गेल्या वर्षीपेक्षा यंदा जादा साखर उत्पादन झाले आहे. गेल्या वर्षी १०५ लाख टन साखर राज्यात तयार झाली होती. यंदा हे उत्पादन १०९ लाख टनांपर्यंत गेले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com