Turmeric Seed  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Seed : छत्तीसगडला ‘एमपीकेव्ही’च्या हळद बियाण्याची भुरळ

Turmeric Production : डिग्रजच्या कृषी तंत्र विद्यालयात हळदीचे उत्पादन

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Turmeric News : पुणे : सांगली जिल्हा हा ब्रिटिश कालखंडापासून गुणवत्तापूर्ण हळदीच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कसबे डिग्रज येथील कृषी तंत्र विद्यालयात हळदीचे उत्पादन घेण्यात आले आहे. गुणवत्तापूर्ण हळद बियाण्यास केवळ महाराष्ट्रातच नाही, तर इतर राज्यातही मोठी पसंती मिळत आहे. या विद्यालयाने तब्बल ५१ टन हळदीचे बियाणे छत्तीसगड येथे पाठविले आहे.

महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रशांतकुमार पाटील यांच्या प्रेरणेने विद्यापीठात आमूलाग्र बदल होत आहेत. सांगलीतील कसबे डिग्रज येथील कृषी तंत्र विद्यालयात प्राचार्य डॉ. मनोज माळी यांनी एक हेक्टर क्षेत्रावर ‘सेलम’ आणि ‘फुले स्वरूपा’ या वाणांचा हळद बीजोत्पादन कार्यक्रम घेतला. मे २०२३ मध्ये लागवड करून उरलेली सर्व कामे खुरपणी, तण नियंत्रण, कीड व रोग प्रतिबंधक उपाययोजना, भरणी खते देणे, ड्रोन तंत्रज्ञानाचा अवलंब केला. त्याद्वारे विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अनुभव आधारित शिक्षण घेतले. ‌वार्षिक परीक्षा सुरू असताना देखील स्वतःहून एक ते दीड तास हळद काढणी, बेणे निवडणे, भेसळ ओळखणे, बेणे साठवणे, मातृकंद, बगलगड्डे, सोरा गड्डे, हळकुंडे आदी कामे त्यांनी केली.

‘हळदीचे उत्पादन क्षेत्र वाढवावे’
हळदीचे निरोगी बियाणे छत्तीसगड राज्यातील अंबिकापूर येथील मॉ आदिशक्ती बीज उत्पादक कंपनीच्या संचालकांना पसंत पडले. त्यांनी कृषी तंत्र विद्यालय आणि हळद संशोधन केंद्राचे एकूण ५१ क्विंटल बियाणे खरेदी करून विद्यार्थ्यांच्या कष्टाचे कौतुक केले. ‘चांगल्या प्रकारचे खोडकिड मुक्त निरोगी बियाणे मिळत नाही. कृषितंत्र विद्यालयाने हळदीचे उत्पादन क्षेत्र वाढवावे. निरोगी निर्यातक्षम बियाणे निर्मितीवर भर द्यावा आणि शेतकरी सेवेत कमी पडू नये, असेही त्यांनी सांगितले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT