Turmeric Rate  Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric Rate : हिंगोलीत हळद दर १२८०० ते १५३०० रुपये

Hingoli Turmeric Market : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १) हळदीची १९०० क्विंटल आवक होती.

Team Agrowon

Hingoli Turmeric News : कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत संत नामदेव हळद मार्केटमध्ये सोमवारी (ता. १) हळदीची १९०० क्विंटल आवक होती. हळदीला प्रतिक्विंटल किमान १२८०० ते कमाल १५३०० रुपये तर सरासरी १४०५० रुपये दर मिळाले. हळदीचे दर पंधरवड्यापासून १००० ते २००० रुपयांनी कमी झाले आहेत.

दोन महिन्यापूर्वी हळदीचे दर १६००० ते १८००० रुपये दरम्यान होते. त्या वेळी दररोज २००० ते ३००० क्विंटलपर्यंत हळदीची आवक होत होती. सध्या हिंगोली येथील हळद मार्केटमध्ये आठवड्यातील पाच दिवस हळदीची आवक घेतली जाते.

बुधवार (ता. २६) ते सोमवार (ता. १) कालावधीत हळदीची एकूण ४५०० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल सरासरी १२८०० ते १५५०० रुपये दर मिळाले. शुक्रवारी (ता. १८) हळदीची १००० क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १३१०० ते कमाल १५७०० रुपये तर सरासरी १४४०० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २६) हळदीची १६०० क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १३००० ते कमाल १५५०० रुपये तर सरासरी १४२५० रुपये दर मिळाले.

वसमतमध्ये ११००० ते १६५०० रुपये दर

वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये गुरुवारी (ता. २७) हळदीची १०१५ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान ११००० ते कमाल १६५०० रुपये तर सरासरी १३७५० रुपये दर मिळाले. बुधवारी (ता. २६) हळदीची ६५६ क्विंटल आवक होऊन प्रतिक्विंटल किमान १०६०० ते कमाल १६५०५ रुपये तर सरासरी १३५५२ रुपये दर मिळाले. मंगळवारी (ता. २५) ४६९ क्विंटल आवक असताना प्रतिक्विंटल किमान १२००० ते कमाल १६५४५ रुपये तर सरासरी १४२७२ रुपये दर मिळाले.

मागील पंधरा दिवसांपासून हळदीच्या दरात घसरण झाली आहे. त्यामुळे २५ ते ३० टक्के आवक कमी झाली आहे. त्यामुळे आठवड्यातील पाच दिवस आवक घेतली जात आहे. १५ जुलैनंतर दर सुधारण्याची शक्यता आहे.
- नारायण पाटील, सचिव, कृ.ऊ.बा.समिती, हिंगोली

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agricultural Challenges : सोयाबीन दराचा मुद्दा ठरला निष्प्रभ

Satara Assembly Constituency Result : सातारा जिल्ह्यात आठही जागांवर महायुतीचा करिष्मा

Maharashtra Assembly Election Result 2024 : ‘ते’ पुन्हा आले!

Vidhansabha Election 2024 : कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांत महायुतीचाच प्रभाव

Maharashtra Weather : किमान तापमानात वाढ होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT