Sericulture Market : पूर्णा येथील मार्केटमध्ये ७५ टन रेशीम कोष खरेदी

Sericulture Update : १ एप्रिल २०२३ ते ता. ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात ९५६ शेतकऱ्यांकडून ७५.४४७ टन रेशीम कोष खरेदी करण्यात आले.
Sericulture
SericultureAgrowon

Parbhani News : परभणी जिल्हा रेशीम विकास अधिकारी कार्यालयाअंतर्गत पूर्णा (जि. परभणी) येथील रेशीम कोष मार्केटमध्ये ता. १ एप्रिल २०२३ ते ता. ३१ मार्च २०२४ या आर्थिक वर्षात ९५६ शेतकऱ्यांकडून ७५.४४७ टन रेशीम कोष खरेदी करण्यात आले. या रेशीम कोषाची किंमत ३ कोटी १३ लाख ५४ हजार ३०० रुपये एवढी आहे, अशी माहिती जिल्हा रेशीम विकास अधिकारी गोविंद कदम यांनी दिली.

Sericulture
Sericulture : रेशीम कोष उत्पादनात गतवर्षीच्या तुलनेत २८ टनांनी वाढ

सातत्याने दुष्काळी स्थितीला सामोरे जावे लागते. पारंपारिक पिकांच्या तुलनेत शाश्वत उत्पन्न देणाऱ्या रेशीम शेतीकडे मागील काही वर्षात मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेडसह अन्य जिल्ह्यातील शेतकरी वळले आहेत. पूर्वी वर्षापूर्वी या भागात रेशीम कोष मार्केट नव्हते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्नाटकातील बंगलोर जवळील रामनगर येथील मार्केटमध्ये कोष विक्रीसाठी न्यावे लागत असते.

२०१९ मध्ये परभणी जिल्ह्यातील सिकंदराबाद ते मनमाड या रेल्वेमार्गावरील पूर्णा जंक्शन येथे रेशीम कोष मार्केट सुरु झाले आहे. या भागातील शेतकऱ्यांना जवळचे मार्केट उपलब्ध झाल्यामुळे वाहतूक खर्चातील बचतीसह शेतकऱ्यांचा वेळ ही वाचत आहे. पूर्णा रेशीम कोष मार्केटमध्ये सध्या ९ व्यापारी रेशीम कोष खरेदीदार आहेत.

Sericulture
Sericulture : दोन हजारांवर गावांत रेशीम शेतीचा विस्तार

मराठवाड्यातील परभणी, हिंगोली, नांदेड, बीड, जालना या जिल्ह्यासह विदर्भातील यवतमाळ, वर्धा आदी जिल्ह्यातून रेशीम कोषाची आवक होते. २०२३-२४ या आर्थिक वर्षात पूर्णा मार्केटमध्ये ९५६ शेतकऱ्यांकडून ७५.४४ टन रेशीम कोष खरेदी करण्यात आले. किमान २४० ते कमाल ८०० रुपये तर सरासरी ७८० दर मिळाले.

ऑक्टोबर २०२३ पासून रेशीम कोषाच्या दरात घसरण सुरु आहे. २०२२-२३ या आर्थिक वर्षात पूर्णा मार्केटमध्ये १ हजार ४१० शेतकऱ्यांकडून १३१ टन रेशीम कोष खरेदी करण्यात आले. रेशीम कोषाला प्रतिकिलो किमान ३५० ते कमाल ८५० रुपये तर सरासरी ४५० रुपये दर मिळाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com