Agriculture GI Agrowon
ॲग्रो विशेष

Turmeric GI : हळद ‘जीआय टॅग’ अधिकृत वापरकर्ता नोंदणीसाठी माहिती द्यावी

Agriculture GI : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड तसेच विदर्भातील वाशीम, अकोला या ५ जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या हळदीला ‘वसमत हळद’ (टर्मरिक) या नावाने भौगोलिक मानांकन ‘जीआय टॅग’ मिळाले आहे.

Team Agrowon

Hingoli News : मराठवाड्यातील हिंगोली, परभणी, नांदेड तसेच विदर्भातील वाशीम, अकोला या ५ जिल्ह्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या हळदीला ‘वसमत हळद’ (टर्मरिक) या नावाने भौगोलिक मानांकन ‘जीआय टॅग’ मिळाले आहे.

वसमत हळद भौगोलिक मानांकनाचे ‘जीआयटॅग’ अधिकृत वापरकर्ता म्हणून नोंदणी व मान्यता मिळविण्यासाठी संबंधित जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या यांना माहिती द्यावी, अशी सूचना वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे व्यवस्थापकीय संचालक राजेंद्र कदम यांनी या ५ जिल्ह्यांच्या जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना पत्राद्वारे केली आहे.

यंदाच्या मार्च महिन्यात ‘वसमत हळद’ या नावाने भौगोलिक मानांकन (जिओग्राफिकल इंडिकेशन ः जी.आय.) मिळाले आहे. त्यानुसार क्लास ३१ मध्ये ‘वसमत हळद’ची (टर्मरिक) नोंद करण्यात आलेली आहे. हिंगोली, नांदेड, परभणी, वाशीम, अकोला या जिल्ह्यांकरिता ‘वसमत हळद’ (टर्मरिक) या नावाने भौगोलिक मानांकनाचा दर्जा दिलेला आहे.

जी. आय. मानांकनामुळे या ५ जिल्ह्यातील हळदीची जगभरात स्वतंत्र ओळख निर्माण होईल. वसमत येथील बाळासाहेब ठाकरे हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे वसमत हळद या भौगोलिक मानांकनाचे अधिकृतधारक आहेत. या ५ जिल्ह्यांतील हळद उत्पादक शेतकरी, शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपन्या हळदीची निर्यात करीत आहेत.

त्यांनी उत्पादित केलेल्या हळदीला वसमत हळद या नावाने भौगोलिक मानांकन (जी.आय. टॅग) वापरण्यासाठी अधिकृत वापरकर्त म्हणून नोंदणी व मान्यता मिळविण्यासाठी विहित कार्यप्रणालीचा अवलंब करावयाचा आहे. त्यासंदर्भात या पाच जिल्ह्यातील हळद उत्पादक शेतकरी, शेतकऱ्यांचे गट, शेतकरी उत्पादक कंपन्यांना अवगत करावे. त्यामुळे पुढील कार्यवाही करणे सोईचे होईल, अशी सूचना कदम यांनी केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT