Farmers Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Farming : तूर शेती शेतकऱ्यांसाठी एक उत्तम पर्याय

Farmer Choice : तुरीचा इतर खरीप पिकाच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी. व्यवस्थापन चांगले केल्यास उत्पादन चांगले मिळत आहे. शिवाय जमिनीची सुपीकता हे पीक वाढवीत आहे.

Team Agrowon

Jalna News : तुरीचा इतर खरीप पिकाच्या तुलनेत उत्पादन खर्च कमी. व्यवस्थापन चांगले केल्यास उत्पादन चांगले मिळत आहे. शिवाय जमिनीची सुपीकता हे पीक वाढवीत आहे. त्यामुळे तूर शेती एक उत्तम पर्याय आपल्यासमोर, असल्याचे मत राष्ट्रीय कृषी संशोधन केंद्राचे प्रमुख डॉ. सूर्यकांत पवार यांनी व्यक्त केले.

जालना जिल्ह्यातील मासिक चर्चा सत्रानिमिताने डिसेंबर महिन्यातील क्षेत्रीय भेटी दरम्यान अंबड तालुक्यातील सोनकपिंपळगाव श्यामराव पवार यांच्या तूर गोदावरी क्षेत्राची पाहणी या सर्व चमूने केली. त्यावेळीं डॉ. पवार बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गहिनीनाथ कापसे, डॉ. संजय पाटील, डॉ. दीपक कच्छवे, डॉ. सचिन धांडगे, कृषी उपसंचालक एस. एस. कायंदे,

उपविभागीय कृषी अधिकारी प्रशांत पवार, परतूरचे राम रोडगे याच्यांसह जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते. यावेळी या चमूने विविध शेती पीक पद्धती राबविणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतात पीक पाहणी करून शेतकऱ्याचे शंका निरसन केल्या. खरिपातील पिकांचा आढावा घेत असताना डॉ. पवार म्हणाले, की तूर पीक सध्या शेतावर विशेष नजरेत येत आहे. या पिकापासून चांगले उत्पादन येईल, अशी आशा आहे.

या पिकाच्या कोरडवाहू शेतीसाठी बी. डी. एन. ७११ आणि बागायती शेतीसाठी गोदावरी बी. डी. एन. २०१३-४१ दोन वाणाने सध्या शेतकऱ्यांना भुरळ घातली आहे. वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ अंतर्गत जालना जिल्ह्यातील कृषी संशोधन केंद्राने विकसित केलेले हे वाण शेतकऱ्याच्या उत्पादनात भर घालत आहेत.

हाच धागा पकडत डॉ. पवार यांनी शेतकरी आणि कृषी विभागातील क्षेत्रीय कर्मचारी यांना तूर पिकाचे अर्थशास्त्र समजून सांगितले. श्री कापसे म्हणाले, की सर्वांनी शास्त्रज्ञांनी दिलेला संदेश गांवागांवातील शेतकरी बांधवापर्यंत पोहच करावा. डॉ. सचिन धांडगे म्हणाले, की शेतकरी पीक संरक्षण म्हणून केवळ रासायनिक कीटक नाशक हाच पर्याय निवड करतात.

वास्तविक कीटकशास्त्र असे कधीच सांगत नाही. कोणत्याही पिकावरील पीक संरक्षण हे एकात्मिक पद्धतीनेच केले पाहिजे. मात्र, या कडे दुर्लक्ष होत आहे. याची काळजी घ्यावी लागेल. रामेश्वर ठोंबरे म्हणाले, की कापूस पऱ्हाटी अजूनही शेतात उभी आहे. गुलाबी बोंड अळीचे खाद्य त्यांना मिळते. त्यामुळे शेतात पऱ्हाटी उभी ठेवू नये. क्षेत्रीय भेटीसाठी तालुका कृषी अधिकारी बी. आर. गंडे, तंत्र अधिकारी संदीप जगताप आणि त्यांच्या चमूने परिश्रम घेतले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indigenous Livestock Breeds: सोळा नव्या देशी पशुजातींना मान्यता

Agro-Service Federation's Protest: प्रस्तावित आकृतिबंधाविरोधात कृषी सेवा महासंघाचे आंदोलन

Agriculture Admission 2026: कृषी शिक्षण प्रवेशासाठी दुसऱ्या फेरीला सुरुवात

Farmer Children Protest: एकरकमी एफआरपीसाठी शेतकरी पाल्यांचे आंदोलन

Prof. Yasmin Sheikh Dies: ज्येष्ठ व्याकरणतज्ज्ञ प्रा. यास्मिन शेख यांचे निधन

SCROLL FOR NEXT