Kharif Sowing  Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : हळद, कपाशी लागवड; सोयाबीन, मूग पेरणी सुरू

Kharif Season : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील अनेक भागांत संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हळद व कपाशीची लागवड सुरू केली आहे.

Team Agrowon

Parbhani News : परभणी व हिंगोली जिल्ह्यांतील अनेक भागांत संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हळद व कपाशीची लागवड सुरू केली आहे. चांगला पाऊस झालेल्या भागातील शेतकऱ्यांनी सोयाबीन, मूग आदी पिकांची पेरणी सुरू केली आहे.

परंतु सर्वदूर अपेक्षित पाऊस नसल्यामुळे पेरण्या सुरू झाल्या नाहीत. दरम्यान, शुक्रवारी (ता. १३) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांत या दोन जिल्ह्यांतील ८१ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. सेलू तालुक्यात वीज कोसळून एका व्यक्तीचा मृत्यू झाला. सहा जनावरे दगावल्याचे वृत्त आहे.

या वर्षीच्या (२०२५) खरिपात परभणी जिल्ह्यात ५ लाख २७ हजार ९०१ हेक्टरवर तर हिंगोली जिल्ह्यात ३ लाख २४ हजार ५५ हेक्टरवर पेरणी प्रस्तावित आहे. मे मध्ये या दोन जिल्ह्यांत सरासरीच्या अनेकपट पूर्वमोसमी पाऊस झाला. त्यामुळे संरक्षित सिंचनाची सुविधा असलेल्या शेतकऱ्यांनी हळद लागवड उरकली.

अनेक भागांत हळद लागवड सुरू आहे. जूनमध्ये सर्वदूर अपेक्षित पाऊस झालेला नाही. गेल्या दोन-तीन दिवसांपासून काही भागात चांगला पाऊस पडत आहे. पुढील काही दिवसांत जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

त्यामुळे अनेक मंडलांतील शेतकऱ्यांनी कपाशीची लागवड सुरू केली आहे. काही भागांत सोयाबीन पेरणी सुरू झाली आहे. परंतु अनेक मंडलांतील शेतकरी पेरणीसाठी जोरदार पावसाची वाट पहात आहेत.

परभणी, हिंगोलीतील ८१ मंडलांत पाऊस

परभणी जिल्ह्यात शुक्रवारी (ता. १३) सकाळी १० पर्यंतच्या २४ तासांमध्ये सरासरी ८.९ मिमी पाऊस झाला. परभणी, जिंतूर, सेलू, मानवत, पाथरी तालुक्यातील अनेक मंडलांत पावसाचा जोर होता. जिल्ह्यात १ जूनपासून आजवर ३७.६ मिमी (५९.७ टक्के) पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २९ मंडलांत हलका ते जोरदार पाऊस झाला. हिंगोली, कळमनुरी, औंढानागनाथ, सेनगाव तालुक्यातील अनेक मंडलांत जोरदार पाऊस झाला. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत सरासरी १९.३ मिमी तर १ जूनपासून आजवर सरासरी ४३.९ पाऊस झाला.

मंडलनिहाय पाऊस (१० मिमीच्यापुढे)

परभणी जिल्हा ः परभणी १९.८, परभणी ग्रामीण १८.८, पिंगळी १८.८, जिंतूर १४.५, सावंगी म्हाळसा ४३.८, बामणी २५.३, देऊळगाव गात १५.३, वालूर ११.८, मानवत १३.५, कोल्हा १९.३, ताडबोरगाव १९.३, पाथरी २३.५, बाभळगाव ११, हादगाव २९, कासापुरी २४.५, वडगाव १२.५, कात्नेश्वर १२.३

हिंगोली जिल्हा ः हिंगोली ११.८, नरसी २१.३, डिग्रस कऱ्हाळे १६.३, कळमनुरी १३.५, आखाडाबाळापूर १८.३, डोंगरकडा २१.५, वारंगा १८.३, वसमत १८.५, हयातनगर १८.५, औंढा नागनाथ १६.३, येळेगाव १६.३, साळणा १४.३, जवळा बाजार २६.३, सेनगाव ३४.८, गोरेगाव ३९, आजेगाव ३९, साखरा ४३.८, पानकन्हेरगाव ५४.३, हत्ता ४३.८.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Namo Drone Didi Scheme : नमो ड्रोन दीदी योजनेतून महाराष्ट्रातील ४७ गटांना अनुदान

Corporate Finance Capitalisms : सत्ताधारी वर्गाचे राजकीय अर्थकारण

Monsoon Crisis Maharashtra : पूर : असमन्वय अनियंत्रणाचा!

Cotton Mechanization : कपाशीमध्ये यांत्रिकीकरण, स्वच्छ कापूस उत्पादनावर संशोधन

Cotton Productivity : जमीन आरोग्य जपल्यास भारतातही ब्राझीलइतकी कापूस उत्पादकता

SCROLL FOR NEXT