Kahrif Season : खरिपासाठी काटेकोर नियोजन करा

आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील.
Kharif Season
Kharif SeasonAgrowon

Chhatrapati Sambhaji Nagar : आगामी खरीप हंगामात बियाणे, खते, कीटकनाशके आदी निविष्ठा सर्वत्र उपलब्ध राहतील. यादृष्टीने काटेकोर नियोजन करावे, तसेच गुणनियंत्रण विभागाने दक्ष राहून बोगस बियाणे (Bogus Seed), खतांची विक्री होणार नाही याबाबतची दक्षता घ्यावी, असे निर्देश कृषी मंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी दिले.

सद्यःस्थितीत सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानीचे अचूक पंचनामे करून तातडीने शासनास अहवाल सादर करावा अशा सूचनाही त्यांनी दिल्या. मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांतील खरीप नियोजनाचा कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शनिवारी (ता. २९)आढावा घेतला.

Kharif Season
Kharif Jowar : सातारा जिल्ह्यात खरीप ज्वारीकडे कल वाढणार

जिल्हाधिकारी कार्यालयातील आयोजित बैठकीस कृषी विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कुलगुरू डॉ. इंद्र मणी मिश्रा, जिल्हाधिकारी अस्तिककुमार पाण्डेय, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक सचिन कलंत्रे, नियोजन संचालक सुभाष नागरे, फलोत्पादन संचालक कैलास मोते, गुणनियंत्रण संचालक विकास पाटील, विस्तार संचालक दिलीप झेंडे, आत्मा संचालक दशरथ तांबाळे, विभागीय कृषी सहसंचालक डॉ. डी. एल. जाधव, लातूरचे कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर तसेच मराठवाडा विभागातील आठही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आदी उपस्थित होते.

कृषी मंत्री श्री. सत्तार म्हणाले, की खते व बियाणे उपलब्धतेसंदर्भात ग्रामसभेच्या माध्यमातून माहिती देण्यासोबतच बियाण्यांची उगवण क्षमता तपासून त्याबाबत मार्गदर्शन करावे. खते, कीटकनाशके यांची भरारी पथकाद्वारे तपासणी करावी. जिल्हाधिकाऱ्यांनी पीक कर्जासंदर्भात तातडीने विविध बँकांसोबत बैठका घेऊन पीक कर्ज वाटपाचा आढावा घ्यावा. कृषी विभागातील रिक्त पदे भरण्यासंदर्भात प्रक्रिया सुरू आहे. पोकरा योजनेचा टप्पा-२ मंजूर झाला आहे.

Kharif Season
Kharif Season Review Meeting : कृषिमंत्र्यांच्या उपस्थितीत आज खरीप आढावा बैठक

यासाठी जागतिक बँकेकडून निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे. टप्पा क्रमांक-१ मधील राहिलेली कामे याअंतर्गत पूर्ण केली जाणार असून टप्पा-२ च्या माध्यमातून १५ जिल्हे सक्षम होण्यासाठी मदत होणार आहे.

प्रधान सचिव श्री. डवले यांनी खरीप हंगामातील खते, बियाणे व इतर निविष्ठांबाबत नियोजन करण्यासोबतच खरीप पिकावरील कीड रोगांच्या प्रार्दूभावाबाबत गावनिहाय जनजागृती करण्याच्या सूचना दिल्या.

कृषी आयुक्त श्री.चव्हाण म्हणाले, की खते, बियाणे तसेच निविष्ठांबाबत अडचण येणार नाही याची दक्षता कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी घ्यावी. कृषी सेवा केंद्रानी दर्शनी भागात खते व बियाणे उपलब्धतेबाबत माहिती नमूद करावी. तसेच भरारी पथक, टोल फ्री क्रमांक, नियंत्रण कक्ष सक्रिय करावा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com