Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Sowing : नगर जिल्ह्यात यंदा तुरीची सरासरीच्या दुप्पट पेरणी

Team Agrowon

Nagar News : जिल्ह्यात तुरीचे सरासरी ३० हजार १०४ हेक्टर क्षेत्र असून आतापर्यंत ६९ हजार ६३६ हेक्टरवर पेरणी झाली आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या आणि कायम पाणीटंचाई असलेल्या पाथर्डी, कर्जत, जामखेड व शेवगाव तालुक्यांत सर्वाधिक तुरीचे क्षेत्र आहे. आतापर्यंत ६ लाख ५४ हजार हेक्टरवर (१११ टक्के) पेरणी झाली आहे.

नगर जिल्ह्यात खरिपाचे ५ लाख ७९ हजार ७६८ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा पावसाचे लवकर आगमन झाल्याने खरिपाच्या पेरण्याही लवकर उरकल्या आहेत. आतापर्यंत ६ लाख ५४ हजार हेक्टरवर (१११ टक्के) पेरणी झाली आहे.

यंदा दुष्काळाच्या झळा सोसलेल्या आणि कायम दुष्काळाशी सामना करणाऱ्या पाथर्डी, कर्जत, जामखेड तालुक्यांत तुरीच्या लागवडीला अधिक प्राधान्य दिल्याचे दिसून येत आहे. जिल्ह्यात पाथर्डीत सर्वाधिक तुरीची लागवड झाली आहे.

तूर उत्पादनात शेतकरी नवीन तंत्रज्ञानाचाही वापर करत असल्याचे दिसून येत आहे. मुगाने सरासरी ओलांडली असून यंदा ४९ हजार ५२४ हेक्टरवर पेरणी झाली आहे. उडदाची सरासरीच्या दीडपट म्हणजे ६० हजार ७४६ हेक्टरवर पेरणी झाली आहे.

सोयाबीनची दुपटीच्या जवळ म्हणजे १ लाख ५७ हजार हेक्टरवर, कापसाची ११७ टक्के म्हणजे १ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. भुईमूग, तीळ, कारळे, सूर्यफूल या तेलबियांची पेरणी मात्र अल्प झाली आहे.

तुरीचे तालुकानिहाय क्षेत्र (हेक्टर)

नगर ः ४७०७, पारनेर ः १९७९, श्रीगोंदा ः ६२१८, कर्जत ः १७,१२६, जामखेड ः ८९९९, शेवगाव ः १००९४, पाथर्डी ः १४२०७, नेवासा ः ५७१९, राहुरी ः २१८, संगमनेर ः ७१, अकोले ः १२, कोपरगाव ः ४२, श्रीरामपूर ः ८०, राहाता ः १६४

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar MSP : इथेनॉलसह साखरेच्या एमएसपीत वाढ करण्याच्या हालचाली

Banana Rate : केळीला ३२०० रुपये कमाल दर

Potato Production : शिरदाळ्यात बटाटा उत्पादनात घट

pH Level of Water : कीडनाशकांच्या लेबलवर नमूद राहील पाण्याचा सामू

Onion Rate : नगरमध्ये कांदा प्रति क्विंटल ५२०० रुपये

SCROLL FOR NEXT