IAS Kumar Ashirwad Agrowon
ॲग्रो विशेष

Employment : रोजगारासाठी प्रयत्न करावेत - जिल्हाधिकारी आशीर्वाद

IAS Kumar Ashirwad : प्रशिक्षण घेतलेला एकही उमेदवार रोजगारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

Team Agrowon

Solapur News : प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियानाच्या माध्यमातून प्रशिक्षण घेतलेल्या उमेदवारांना स्वयंरोजगार अथवा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य विकास विभाग तसेच संबंधित प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेने ही प्रयत्न करणे गरजेचे आहे.

याअंतर्गत प्रशिक्षण घेतलेला एकही उमेदवार रोजगारापासून वंचित राहणार नाही यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी काळजी घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यात जिल्हा कार्यकारी समितीच्या आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद बोलत होते. या वेळी कौशल्य विभागाचे सहायक आयुक्त हनुमंत नलावडे, जिल्हा समन्वयक कृष्णा यादव, जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. बी. काटकर यांच्यासह संबंधित विभाग प्रमुख उपस्थित होते.

जिल्हाधिकारी आशीर्वाद म्हणाले, प्रमोद महाजन कौशल्य उद्योजकता विकास अभियानांतर्गत किमान कौशल्य विकास कार्यक्रम सन २०२३-२४ बॅच वाटप करत असताना कौशल्य विकास विभागाने जिल्ह्यातील कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या सर्व अधिकृत संस्था शासनाने विहित केलेल्या नियमाप्रमाणे प्रशिक्षण उमेदवारांना देत आहेत का यावर नियंत्रण ठेवावे.

कोणत्याही प्रकारे शासन नियमाप्रमाणे प्रशिक्षण पूर्ण होत असल्याची खात्री करावी. प्रशिक्षण झाल्यानंतर संबंधित उमेदवारांना रोजगार अथवा स्वरोजगार उपलब्ध करण्याबाबत प्रयत्न करावेत, अशा सूचना त्यांनी दिल्या. मार्गदर्शन केंद्राचे व सहायक संचालक हनुमंत नलावडे यांनी प्रास्ताविक केले. या वेळी प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रातिनिधिक दहा उमेदवारांना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Argentina Agriculture Market: अर्जेंटिनामध्ये फळे, प्रक्रिया उत्पादनांना मागणी

Summer Health Safety: उष्माघात दक्षतेबाबत यंत्रणा सुसज्ज ठेवा

Agri Water Management: तुषार सिंचनाधारित मॉडेलने वाढविली रब्बी पिकांची उत्पादकता

Farmers Protest: पंजाबमधील शेतकऱ्यांचे आंदोलन स्थगित, सरकारशी चर्चा सुरु, खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्याचे आश्वासन

Land Measurement: पुढच्या काळात केवळ १५ दिवसांत जमीन मोजणी, मग खरेदीखत अन् नंतर फेरफार, जाणून घ्या महत्त्वाची माहिती

SCROLL FOR NEXT