Truck Driver strike  Agrowon
ॲग्रो विशेष

Truck Driver strike : ट्रक चालकांच्या संपांचा बाजार समित्यांसह एसटीवर परिणाम?

Consequences of the truck drivers strike : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदी जाचक असल्याचा आरोप ट्रक चालकांनी केला आहे. या तरतुदींविरोधात ट्रक चालकांनी संप सुरु केला आहे. ज्याचा परिणाम राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितींसह अनेक ठिकाणी होताना दिसत आहे.

Aslam Abdul Shanedivan

Pune News : केंद्र सरकारच्या नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे राज्यभर ट्रक चालकांनी संप पुकारला आहे. हा संप सोमवारी (१ रोजी) सुरू झाला असून याचा मंगळवारीही (२ रोजी) परिणाम दिसून आला. अनेक पेट्रोल पंपावर रांगा दिसत आहेत. तर कोठे राष्ट्रीय महामार्गवर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अनेक कृषी उत्पन्न बाजार समित्यात ही या संपाचा परिणाम दिसत आहे. त्यामुळे भाजीपाल्यांच्या दर वाढले आहेत.

नवीन मोटार वाहन कायद्यातील तरतुदींमुळे राज्यभरातील ट्रक चालकांनी संपाचे हत्यार उपसले आहे. ज्यामुळे पेट्रोल पंपावर रांगा, राष्ट्रीय महामार्गवर वाहतूक कोंडी, एसटी वाहतूकीवर परिणामासह कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर विपरीत परिणाम झालेला दिसत आहे.

पुणे एपीएमसी मार्केट

ट्रक चालकाच्या संपाचा पुणे एपीएमसी मार्केटमध्ये चांगलाच परिणाम झाल्याचे समोर येत आहे. या संपामुळे येथील आवक कमी झाली असून याचा परिणाम थेट मालावर झाला आहे.

कल्याण एपीएमसी

सध्या या संपांचा कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीत परिणाम दिसत नाही. येथे भाजीपाला, कांदासह इतर मालाची आवक झाली आहे. मात्र बुधवारी (३ रोजी) येथे परिणाम होण्याची शक्यता असून बाजार समिती परिसरात येणारे ट्रक चालक देखील यात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आवक 30 टक्यांनी घटली

ट्रक चालकांच्या संपाचा अमरावती बाजार समितीवर मोठा परिणाम दिसून येत आहे. येथे भाजीपाल्याची आवक 30 टक्यांनी घटली आहे. त्यामुळे भाजीपाल्याच्या दरात वाढ झाली आहे. येथे दररोज 35 ते 40 ट्रक आवक होत होती. मात्र या संपामुळे आठ ते दहा ट्रकच आवक आली आहे. ज्यामुळे येथे टोमॅटोच्या दरात प्रति कॅरेट 150 रुपयांची वाढ झाली आहे.

एसटी मंदावली?

या संपाचा परिणाम अमरावती बाजार समितीवरही झाला आहे. मात्र याचा परिणाम एसटीवर झालेला नाही. येथे जिल्ह्यातील एसटी डेपोंमध्ये पुढचे पाच दिवस पुरेल इतका डिझेलचा साठा उपलब्ध असल्याने एसटीची सेवा सुरळीत राहिल. पण यानंतरही हा संप सुरू राहिलाच तर एसटी मंदावेल.

बुलडाण्यात एसटी सेवेला फटका

या संपांचा बुलडाण्याच्या एसटी सेवेला फटका बसला आहे. येथे फक्त बुधवारपर्यंत (३ रोजी) पुरेल इतकाच डिझेलचा साठा आहे. त्यामुळे संप असाच सुरू राहिल्यास बुलडाण्यात ७ ही डेपोतील एसटीला ब्रेक लागू शकतो.

मनमाड शहरात इंधन व गॅस आडकले

राज्याला इंधन पुरवठा हा मनमाड शहरातून मोठ्या प्रमाणात होतो. मात्र या संपामुळे इंधन व गॅस प्रकल्पातून होणारी वाहतूक थांबली आहे. या संपात येथील ट्रँकर चालक सहभागी झाले असून १५०० वाहने येथे थांबून आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Vidhan Sabha Election Results : काँग्रेसच्या दिग्गजांना मोठा धक्का, पृथ्वीराज चव्हाण, थोरात, देखमुखांसह काँग्रेसचे अनेक दिग्गज पिछाडीवर

Climate Change Issue : हवामान बदलाच्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी हवे ‘हवामान वित्त’

Maharashtra Vidhansabha Result 2024 : लाडकी बहिण योजनेचा महायुतीला फायदा; सोयाबीन दराचा मुद्दा ठरला 'फेल'?

Maharashtra Assembly Election : कोल्हापूर जिल्ह्यातील डझनभर कारखानदारांचे भवितव्य ठरणार, पहिल्या ३ तासांचा काय सांगतो कल

Farmers Exploitation : कोणा सांगाव्या शेतकऱ्यांच्या व्यथा

SCROLL FOR NEXT