Ration Shopkeepers Strike
Ration Shopkeepers StrikeAgrowon

Ration Shopkeepers Strike : नववर्षाच्या स्वागतालाच रेशन दुकानदारांचा असहकार; १ जानेवारीपासून देशव्यापी संप

Nationwide strike by ration shopkeepers : १ जानेवारी पासून रेशन दुकानदारांनी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच यात सर्व दुकानदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.
Published on

Pune News : नववर्षाच्या सुरूवात होत आहे. सगळं जग नव्या वर्षाच्या स्वागताच्या तयारीला लागले आहे. मात्र याचदरम्यान सर्वसामान्यांना मात्र आता धान्यसाठी दुकान कधी उघणार याकडे लक्ष देण्याची वेळ येणार आहे. १ जानेवारी पासून रेशन दुकानदारांनी देशव्यापी संप पुकारला आहे. तसेच यात सर्व दुकानदारांनी सहभागी व्हावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

रेशन दुकानदारांच्या संघटनेने याबाबात पत्रक काढले आहे. यात, 'ऑल इंडिया फेयर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशन, नवी दिल्ली, या देशपातळीवरील संघटनेने नव्या वर्षातील १ जानेवारी पासून देशव्यापी संप पुकारला आहे. या आंदोलनामध्ये उत्स्फूर्तपणे सर्वांनी सहभागी घ्यावा', असे आवाहन करण्यात आले आहे.

Ration Shopkeepers Strike
Ration Shop : जळगाव जिल्ह्यात रेशन दुकाने बंदचा ‘फियास्को’

तसेच 'आपली रेशन दुकाने बंद ठेवावीत. आपापल्या दुकानातील ई-पॉस मशीन बंद ठेवावीत. कोणत्याही प्रकारे धान्याची उचल व वितरण देखील करू नयेत', असे देखील काढलेल्या परिपत्रकात म्हटलं आहे.

राज्यभरात सुमारे ५३ हजार रास्त भाव दुकानदार असून विविध प्रलंबित मागण्यांसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच प्रलंबित मागण्यांसंदर्भात केंद्र आणि राज्य सरकार उदासीन असल्याची टीका देखील या पत्रकात करण्यात आली आहे.

Ration Shopkeepers Strike
Ration Card Scheme : आता देशात कुठेही रेशन धान्य मिळणार, काय आहे एक देश एक रेशन कार्ड योजना

तसेच केंद्र आणि राज्य सरकारकडून रेशन दुकानदाराकडून होणाऱ्या आंदोलनाची दाखल घेतली जात नाही. नागपूरच्या हिवाळी अधिवेशन काळात फक्त पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत अश्वासन देण्यात आली. मात्र ठोस निर्णय घेतला जा नाही. त्यामुळे नाईलाजास्तव ऑल इंडिया फेअर प्राईस शॉप डीलर्स फेडरेशनकडून हा संप पुकारण्यात आला आहे. यात राज्यातील रेशन दुकानदारांनी सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे.

या अंदोलनास ०१ जानेवारी पासून सुरुवात होत आहे. तसेच प्रत्येक स्वस्त धान्य दुकानदार हे तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार आहेत. तसेच निदर्शने, धरणे, घंटा नाद, थाळी नाद करून आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करतील असेही या पत्रकात म्हटलं आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com