Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Seller : कृषी निविष्ठा विक्रेत्यांना सन्मानाने वागवा

Team Agrowon

Pune News : राज्यातील कृषी निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांशी मग्रुरपणे वागणाऱ्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांना कृषी आयुक्तालयाने तंबी दिली आहे. तपासणीला गेल्यानंतर ओळखपत्र दाखवा आणि विक्रेत्यांना सन्मानाने वागवा, असा आदेश देण्यात आला आहे.

आयुक्तालयाने जारी केलेल्या या आदेशाची सध्या राज्यभर चर्चा आहे. विविध जिल्ह्यांमधील खते, बियाणे, कीटकनाशके विक्रेत्यांनी तसेच निविष्ठा उत्पादक व विक्रेत्यांनी आयुक्तालयाच्या भूमिकेचे स्वागत केले आहे. राज्यातील काही निरीक्षक तपासणीसाठी विक्रेत्यांकडे, उत्पादकांकडे किंवा साठवणुकीच्या ठिकाणी गेल्यानंतर ओळखपत्र दाखवत नाहीत. विक्रेत्यांशी सौजन्याने वागत नाहीत तसेच तपासणीच्या वेळी धमकीवजा वक्तव्ये करतात, असा गंभीर ठपका आयुक्तालयाने ठेवला आहे.

निरीक्षकांनी तपासणीच्यावेळी यापुढे दर्शनी भागात ओळखपत्र लावावे किंवा संबंधितांना ते दाखवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तपासणीबाबत शक्यतो संबंधितांना पूर्वकल्पना द्यावी, नियमानुसारच तपासणी करावी, विक्रेत्यांना अजिबात धमक्या देऊ नयेत, असे आयुक्तालयाने बजावले आहे.

राज्यातील गुणनियंत्रण निरीक्षकांना तपासणी दरम्यान किरकोळ त्रुटी आढळल्यास संबंधितांना १५ दिवसांची मुदत दोनवेळा देण्याच्या सूचना आयुक्तालयाने केल्या आहेत. राज्यातील निविष्ठा उत्पादक, वितरक व विक्रेते त्यांचे काम कृषी क्षेत्रासाठी योगदान देणारे आहेत. त्यामुळे ते कृषी क्षेत्रातील सन्मानीय व्यक्ती आहेत. त्यामुळे त्यांना तपासणीच्यावेळी आदराने वागवावे, असे कृषी आयुक्तालयाच्या आदेशात नमूद करण्यात आले आहे.

गंभीर प्रकाराबाबत तत्काळ कारवाई करा

किरकोळ त्रुटी असल्यास गुणनियंत्रण निरीक्षकांनी दोनवेळा मुदत द्यावी व त्रुटींची पूर्तता करुन घ्यावी. मात्र, अप्रमाणित निविष्ठा, बोगस निविष्ठा, विनापरवाना उत्पादन व विक्री किंवा बंदी असलेल्या निविष्ठांची विक्री अथवा उत्पादनाचा गंभीर प्रकार होत असल्यास निरीक्षकांनी नियमानुसार तत्काळ कारवाई करायला हवी, असाही निर्वाळा कृषी आयुक्तालयाने दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Makhana Benefits : मखनाचे आरोग्यदायी फायदे

Rahul Gandhi : राहुल गांधीचा भाजपवर हल्लाबोल, कोल्हापुरात शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण

Agriculture Processing : केळी चिप्स, हळद पावडरीचा ‘जटाशंकर’ ब्रॅण्ड

Sweet Potato : नवरात्रीला ‘शाहूवाडी’ रताळ्यांचा गोडवा

Floriculture : शेतकरी नियोजन : फुलशेती

SCROLL FOR NEXT