Agricultural Input Sellers : नगर जिल्ह्यात ४२ कृषी निविष्ठा विक्रेत्यांवर कारवाई

Agriculture Update : गेल्या वर्षी मॉन्सून उशिरा आल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा पाऊस वेळेवर आल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे.
Agricultural Inputs
Agricultural Inputs Agrowon
Published on
Updated on

Nagar News : गेल्या वर्षी मॉन्सून उशिरा आल्याने खरिपाचे मोठे नुकसान झाले होते. यंदा पाऊस वेळेवर आल्याने शेतकऱ्यांची पेरणीसाठी लगबग सुरू आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काही दुकानदारांनी काळाबाजार सुरू केला आहे. शेतकऱ्यांना चढ्या भावाने बियाणे आणि खते खरेदी करावी लागतात. या प्रकाराची कृषी विभागाने व जिल्हा परिषदेने गंभीर दखल घेत १२ कृषी सेवा केंद्रांचे परवाने रद्द केले आहेत. ३० चालकांना नोटिसा बजावल्या आहेत.

जिल्ह्यातील कृषी सेवा केंद्रांवर नियंत्रण ठेवण्यासाठी चौदा तालुक्यात पथके तैनात केली आहे. त्याद्वारे केंद्रांवर जाऊन तपासणी केली जात आहे. विक्रीसाठी येणारे बियाणे, विक्री झालेले बियाणे, शिल्लक साठा, त्यांचे बॅच नंबरसह तपासला जात आहे. पथकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्ह्याचे स्वतंत्र पथक आहे. असे असतानाही काही कृषी सेवा केंद्रचालक काळाबाजार करताना आढळले आहेत.

Agricultural Inputs
Agriculture Input Sale Center : पंधरा कृषी निविष्ठा विक्री केंद्रांचे परवाने निलंबित

शेतकऱ्यांनी केलेल्या तक्रारीनुसार सुमारे ७०० केंद्र चालकांबाबतची तक्रारीची प्रकरणे कृषी विभागाकडे पाठवली होती. त्यावर सुनावणी पूर्ण झाली आहे. तीन दुकानदारांवर गुन्हे नोंदवले आहेत. ३० केंद्रचालकांना नोटिसा बजावल्या आहेत. चढ्या भावाने खते व बियाणे विक्री केल्याचा दुकानदारांवर कारवाई कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागाने ३०० बियाणे व १२५हून अधिक खतांचे नमुने घेतले आहेत. ते तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठवले आहेत. शेतकऱ्यांचा सोयाबीन, कपाशी लागवडीवर भर आहे. तूर, उडदाचाही पेराही वाढला आहे. बाजरी पेरणीही सुरू आहे.

सध्या काही ठिकाणी वाफसा झालेला नाही. याचाच दुकानदारांकडून गैरफायदा घेतला जात आहे. वाढती मागणी लक्षात घेता चढ्या भावाने खते आणि बियाण्यांची विक्री केली जात आहे. राहुरी, नेवासा, संगमनेर, अकोले तालुक्यांतील दुकानदारांवर कृषी विभागाने कारवाई केली आहे. शेतकऱ्यांनी बियाणे खरेदी करताना पक्के बिल मागावे. पेरलेल्या बियाण्याचा नमुना जपून ठेवावा. त्याची पिशवीही (बॅच क्रमांक) सांभाळून ठेवली पाहिजे.

Agricultural Inputs
Agriculture Input Center : कृषी निविष्‍ठा विक्री केंद्राबाहेर साठाफलक, भावफलक लावावा

फसवणूक झाल्यास शेतकऱ्यास भरपाई मिळते. दुकानदारांनी भावफलक लावणे आवश्यक आहे. साठ्याची माहितीही दर्शनी भागात लावावी. जादा दराने बियाणे विकले जाते. कधी एखादे खत माथी मारले जाते किंवा बियाणेच बनावट निघते. अशा वेळी शेतकऱ्यांनी आठ दिवसांत तक्रार नोंदवायला हवी. त्यासाठी ९८२२४४६६५५ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर किंवा ११००२३३४००० या क्रमांकावर तक्रार नोंदवता येईल, असे कृषी विभागातून सांगण्यात.

...अशी झालीय कारवाई

बियाण्यांचे नमुने ३१३

खतांचे नमुने १३९

कीटकनाशकांचे ६५

केंद्र परवाना निलंबित १२

केंद्र परवाना रद्द १२

कृषी सेवा केंद्र २ हजार ८००

नोटिसा ४०

गुन्हे दाखल २

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com