Dr. Praveen Gedam Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Commissioner Transfers : डॉ. प्रवीण गेडाम बनले राज्याचे नवे कृषी आयुक्त

Maharashtra Officers Transfers : कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली झाली आहे

Swapnil Shinde

IAS Transfer : सतत वादाच्या भोवऱ्यात अडकणारे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी डॉ. प्रवीण गेडाम यांची कृषी आयुक्त पदी नियुक्ती करण्यात आली आहे. तर चव्हाण यांच्याकडे जलसंधारण सचिव पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुनील चव्हाण यांची एक वर्षापूर्वी तत्कालीन कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी आग्रहाने कृषी आयुक्त पदी बदली करण्यात आली होती. आता ते जलसंधारण सचिव म्हणून काम करणार आहेत. मंत्रिमंडळ विस्तार झाल्यानंतर कृषीमंत्री पदी धनंजय मुंडे यांची निवड झाल्यानंतर कृषी आयुक्तांची बदली होणार अशी चर्चा होती. त्यानंतर आज प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या. प्रवीण गेडाम यांनी सोलापूरमध्ये वाळू उपसा रोखणारा सोलापूर पॅटर्न अतिशय प्रभावीपणे राबवला होता. आता त्यांच्या खांद्यावर राज्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या कृषी आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली.

कृषी आयुक्त डॉ. गेडाम हे २००२ मध्ये महाराष्ट्र केडरमधून भारतीय प्रशासकीय सेवेत दाखल झाले. २००५ मध्ये जळगाव महापालिकेचे आयुक्त, लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सोलापूर व धाराशीवचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी उत्तम काम केले. त्यानंतर २०१७ पासून ते केंद्रात प्रतिनियुक्तीवर गेले. तत्कालीन रेल्वेमंत्री पियुष गोयल यांचे ते खासगी सचिव होते. आयुष्यमान भारत योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली. सध्या अध्ययन रजेवर होते त्यांनी हॉवर्ड विद्यापीठातून सार्वजनिक आरोग्य विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT