Dilip Swami Agrowon
ॲग्रो विशेष

Election Process : निवडणूक प्रक्रिया बिनचूक होण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : निवडणूक प्रक्रियेत मतदान हा एक महत्त्वाचा टप्पा असतो. हा टप्पा अधिक बिनचूक व पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी प्रशिक्षण आवश्यक असते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी बुधवारी (ता. ६) केले.

आगामी लोकसभा निवडणुकींच्या अनुषंगाने ४०० क्षेत्रीय अधिकाऱ्यांचे निवडणूक प्रशिक्षण बुधवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात पार पडले. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी देवेंद्र कटके, उपविभागीय अधिकारी राठोड, उपजिल्हाधिकारी प्रभोदय मुळे तसेच जिल्हाभरातील ४०० क्षेत्रीय अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले, की मतदान प्रक्रिया विनाअडथळा पार पाडण्यासाठी प्रशिक्षण महत्त्वाचे आणि गरजेचे आहे. मतदान यंत्र, कंट्रोल युनिट, व्हीव्हीपॅट या यंत्रांची जोडणी, योग्य तपासणी व हाताळणी योग्य पद्धतीने करणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्यक्ष हाताळणी प्रशिक्षण दिले जात आहे.

या प्रशिक्षणाद्वारे सर्व प्रक्रिया समजून घ्यावी. या दरम्यान प्रत्यक्ष मतदान केंद्रावर येणाऱ्या अडचणींचे आकलन करून त्यादूर करून ऐनवेळी निर्माण होणाऱ्या परिस्थितीबाबत खबरदारी घेणे आवश्यक आहे. मतदान केंद्रावर जाण्यासाठी नेमून दिलेल्या वाहनाचाच वापर करणे बंधनकारक आहे.

मतदानाच्या दिवशी दर दोन तासांनी अहवाल देण्याची जबाबदारी पार पाडावी. क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी नेमून दिलेल्या केंद्रावर पार पाडावयाच्या जबाबदारीबाबत सखोल माहिती करुन घ्यावी व आपले काम चोख पणे पार पाडावे. या प्रशिक्षणाचा फायदा जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया अधिक पारदर्शक व बिनचूक पार पाडण्यासाठी होईल, असा विश्वासही जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी व्यक्त केला. उपविभागीय अधिकारी राठोड यांनी सादरीकरण करून व्हीव्हीपॅट, मतदान यंत्र, कंट्रोल युनिट वापर व हाताळणीबाबत प्रशिक्षण दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Value Chain Development Plan : कंत्राटदार साखळी विकास योजना

Mahaagromart E-Portal : ‘महाॲग्रोमार्ट’ला स्कॉच पुरस्कार

Agrowon Diwali Ank 2024 : गोठ्यात राबणाऱ्या हातांनी केले ‘ॲग्रोवन’ दिवाळी अंकाचे थाटात प्रकाशन

Heavy Rain : आभाळ फाटले, हातातोंडाशी आलेला घास हिरावला

Sugar Factory Repayment : आमची राखीव थकहमी द्या

SCROLL FOR NEXT