Goa Nagpur Highway : नागपूर -गोवा शक्तीपीठ महामार्ग थांबवा, अन्यथा सामूहिक आत्महत्या होतील; शेतकऱ्यांचा इशारा

Hasan Mushrif : कागल तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी यावर विरोध करत काल जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले.
Goa Nagpur Highway
Goa Nagpur Highwayagrowon
Published on
Updated on

Kolhapur Bhaktimarg : गोव्यापासून ते नागपूरपर्यंत तिर्थक्षेत्रांना जोडणाऱ्या शक्तीपीठ भक्तीमार्गाला कोल्हापूर जिल्ह्यातून तीव्र विरोध होत आहे. हा मार्ग जाणाऱ्या क्षेत्रामध्ये हजारो एकर पिकाऊ शेती जाणार असल्याने शेतकऱ्यांनी आपली एकजूट दाखवण्यास सुरूवात केली आहे. कागल तालुक्यातील काही शेतकऱ्यांनी यावर विरोध करत काल जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदन दिले. दरम्यान यावर सरकारने लवकर निर्णय न घेतल्यास शेतकरी सामुहीक आत्महत्या करतील असा थेट इशारा देण्यात आला आहे.

नागपूर- गोवा शक्तिपीठ महामार्गाला तीव्र विरोध आहे. या बदल्यात सांगली फाटा-कागल-निढोरी-मुरगूड असा पर्यायी मार्ग काढावा; अशा भावना कोगील बुद्रुक (ता. करवीर) येथील शेतकऱ्यांनी व्यक्त केल्या. हनुमान मंदिरात बैठक झाली. याबाबत प्रशासनाकडून सकारात्मक कार्यवाही झाली नाही तर तर सामूहिकरित्या आत्महत्या करण्याचा इशारा ग्रामस्थांनी प्रशासनाला दिला आहे.

यादरम्यान गतवर्षी झालेल्या समृद्धी महामार्गाचा गावकऱ्यांना काहीच उपयोग झालेला नाही. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांवर अन्याय करणारा शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही. जिल्ह्यातील ५९ गावांमधून हा मार्ग जातो. त्यापैकी एक कोगील बुद्रुक, या गावातील ६४ शेतकऱ्यांची एकूण १७० एकर बागायत जमीन या महामार्गाखाली जाणार आहे.

याबाबतचा नकाशाही प्रसिद्ध झाला - आहे. महामार्गामुळे नदी किनारा ते - कोगील बुद्रुकपर्यंत पाच कोटी रुपये - खर्च करून आणलेली पाणी योजना - बंद पडून शेतकऱ्यांची बागायत जमीन जाणार आहे. यासोबतच काही शेतकऱ्यांमध्ये शेतजमिनीसोबत घरेही जाणार आहेत.

Goa Nagpur Highway
Goa to Nagpur Bhaktimarga : गोवा ते नागपूर भक्तीमार्गाला कोल्हापुरातील शेतकऱ्यांचा तीव्र विरोध

शक्तिपीठ मार्गास विरोध म्हणून गावकऱ्यांनी गावाच्या प्रमुख प्रवेशद्वारापाशी निषेध दर्शविणारा डिजिटल फलकही लावला आहे. या महामार्गाचा विरोध म्हणून पालकमंत्री हसन मुश्रीफ, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे ठराव देण्यात आलेला आहे.

शक्तिपीठामुळे गावातील १७० एकर बागायत जमीन तसेच गावची पाण्याची योजना बंद होईल. शेतजमीन गेल्यामुळे गावातील शेतकरी भूमिहीन होणार आहेत. हा शेतकऱ्यांवर अन्याय आहे, या शक्तिपीठ महामार्गाला आमचा तीव्र विरोध आहे. रामगोंड पाटील, माजी पोलिसपाटील

८८ होणाऱ्या महामार्गामुळे माझी स्वतःची सहा एकर बागायती जमीन घरासह जाणार आहे. माजी उपजीविका संपूर्णपणे शेतीवर आहे. महामार्गामुळे माझे मोठे नुकसान होणार आहे. त्यामुळे यावर पर्यायी मार्ग काढून महामार्ग करण्यात यावा. बळवंत पाटील, शेतकरी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com