PM Food Processing Industry Scheme Training Program  Agrowon
ॲग्रो विशेष

PM Food Processing Industry Scheme : पंतप्रधान अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत ‘केव्हीके’मध्ये प्रशिक्षण

Training Program : अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी केले.

Team Agrowon

Akola News : जळगाव जामोद येथील कृषी विज्ञान केंद्रात (केव्हीके) अन्नप्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत तीन दिवसांचा प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात आला. उद्घाटन तालुका कृषी अधिकारी धीरज वाकोडे यांनी केले.

या वेळी केव्हीके प्रमुख विकास जाधव, शामसुंदर बोर्डे, शशांक दाते आणि जिल्हा संसाधन व्यक्ती विजय अस्वार प्रमुख उपस्थित होते. या वेळी जाधव यांनी प्रशिक्षणार्थीना योग्य पद्धतीने प्रकल्प नियोजन करण्याचे आवाहन केले.

वाकोडे यांनी प्रशिक्षणार्थींना कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली. त्यानंतर बोर्डे यांनी प्रशिक्षणार्थींना यशस्वी उद्योजकतेचे गमक, उद्योग चालवताना करावयाचे नियोजन याबाबत माहिती दिली.

दुसऱ्या दिवशी प्रशिक्षणार्थींना भेंडवळ येथील महिला उद्योजिका सिंधूताई निर्मळ यांच्या उद्योगाची भेट घडवून आणली. तिसऱ्या दिवशी प्रशिक्षणाच्या विविध विषयांवरील मार्गदर्शन देण्यात आले.

यात प्रामुख्याने उद्योजकता विकास, अन प्रक्रिया व्यवस्थापन, बॅंकिंग व्यवहारावर सखोल मार्गदर्शन झाले. समारोपप्रसंगी जिल्हा संसाधन व्यक्ती शुभम दाभाडे, विकास जाधव, शामसुंदर बोर्डे आणि शशांक दाते उपस्थित होते. कार्यक्रमासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषी उपसंचालक संजीवनी कणखर, कृषी सहायक अमोल पाटील यांनी सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fodder Management: कमी पावसाच्या स्थितीत चाऱ्याचे आत्तापासून करा नियोजन

Gharkul Yojana : सोलापुरात ३ हजारांहून अधिक घरकुल लाभार्थींना ७२२२ ब्रास वाळूचे वाटप

Weed Removal Begins: भात, नाचणी पिकांत तण काढणी सुरू

Sugarcane Dues : जिल्ह्यात ३३७ कोटींची ऊसबिले अद्यापही थकीत

Ravikant Tupkar: रविकांत तुपकरांना पोलिसांची नोटीस; पण आंदोलनावर ठाम

SCROLL FOR NEXT