Agriculture Training Agrowon
ॲग्रो विशेष

Women Farmer Training : ‘आत्मा’मार्फत हवेली तालुक्यातील महिला शेतकऱ्यांना प्रशिक्षण

Training Update : महिलांसाठी २४ ते २६ ऑक्टोबर हे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

Team Agrowon

Pune News : कृषी विभाग कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणाअंतर्गत राज्याअंतर्गत भाटे (रत्नागिरी) येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्र आणि शिरगाव भात संशोधन केंद्र अशा दोन्ही ठिकाणी महिलांसाठी २४ ते २६ ऑक्टोबर हे तीन दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले होते.

यामध्ये महिलांना नारळ, भात, मसाला पिके, मत्स्यव्यवसाय या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी कल्याण मोरदरी व गाऊडदरा येथील महिला सहभागी झाल्या होत्या.

प्रशिक्षणानंतर पोमेंडी येथील जिल्हा मध्यवर्ती रोपवाटिका, जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद्चाचणी प्रयोगशाळा, शिरगाव सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र येथे भेटी दिल्या. प्रकल्प संचालक सूरज मडके, प्रकल्प उपसंचालक श्रीधर काळे, तालुका कृषी अधिकारी मारुती साळे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

प्रशिक्षणाचे नियोजन मंडळ कृषी अधिकारी एस. पी. खटके, सहायक तंत्रज्ञान व्यवस्थापक रेश्मा शिंदे यांनी केले. या प्रशिक्षणासाठी कृषी सहायक सोनाली कादबणे, ज्योती साळुंखे, सोनाली वाडेकर, मेघा राठोड, माधुरी गवळी व मधुरा रासकर यांनी सहकार्य केले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Energy: ‘एलपीजी’वाले गॅसवर; बायोगॅस उभारणाऱ्यांना ‘नो टेन्शन’

Livestock Farming: पशुपालन उद्योजकतेस मिळणार चालना

Middle East Conflict: इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या रणनीतीचे विपरीत परिणाम

Agriculture Subsidy: कृषी अवजारे बँक स्थापनेसाठी मिळणार ६० टक्के अनुदान

Sugar Production: देशातील साखर उत्पादनात ८६ टक्के वाटा तीन राज्यांचा

SCROLL FOR NEXT