Goat Farming: शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवून शेतीपूरक व्यवसायांना चालना देण्यासाठी राज्य शासनाने ‘मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या योजनेत दुग्ध व्यवसाय, शेळी-मेंढीपालन, कुक्कुटपालन, तसेच चारा विकास अशा विविध घटकांद्वारे ग्रामीण भागात पशुधनावर आधारित उद्योजकता वाढविण्यावर भर देण्यात येणार आहे. .मंत्रिमंडळाने नुकतीच या योजनेस मान्यता दिली. या योजनेअंतर्गत पाच दुधाळ गाई किंवा म्हशींच्या प्रकल्पासाठी सुमारे ११.३५ लाख रुपयांचा प्रकल्प मंजूर असून सर्वसाधारण लाभार्थ्यांना ५० टक्के (सुमारे ५.६७ लाख रुपये), तर अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील लाभार्थ्यांना ७५ टक्के (सुमारे ८.५१ लाख रुपये) अनुदान देण्यात येणार आहे..Livestock Farming Training: खुपिरेत शेळीपालन-कुक्कुटपालन प्रशिक्षणास महिलांचा प्रतिसाद.तसेच ५०+५ शेळी-मेंढी गट प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे ११.३८ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे. या प्रकल्पासही सर्वसाधारण प्रवर्गाला ५० टक्के, तर अनुसूचित जाती-जमातींना ७५ टक्के अनुदान मिळणार आहे..Livestock Farming: दुष्काळी शेतीला शेळीपालनाने सावरले .शेतीपूरक व्यवसायांना उद्योजकतेचे स्वरूप देऊन ग्रामीण भागातील उत्पन्न वाढवणे आणि पशुधन क्षेत्राचा राज्याच्या अर्थव्यवस्थेतील वाटा वाढवणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे शासनाने स्पष्ट केले आहे..अल्पभूधारक, अत्यल्प भूधारकांना प्राधान्यया योजनांमधून अल्पभूधारक, अत्यल्पभूधारक, वनहक्कधारक, तसेच महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येणार असून महिलांसाठी ५० टक्के आणि दिव्यांगांसाठी ५ टक्के आरक्षण लागू राहणार आहे. अनुदानाची रक्कम थेट लाभार्थ्यांच्या खात्यात डीबीटीद्वारे जमा केली जाणार आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.