Patravali Making Business Agrowon
ॲग्रो विशेष

Patravali Making Business : पत्रावळ्या कालबाह्य झाल्‍याने हिरावला रोजगार

Leaf Plate Making : पळसाच्या पानांपासून बनवलेली पत्रावळ म्हणजे एकेकाळी लग्न- मुंज-पूजा समारंभातील अविभाज्य भाग होती. अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर जंगल परिसरात लोकांचा पत्रावळी बनवणे हा बारमाही व्यवसाय होता.

Team Agrowon

Aalibaug News : अलिबाग : पळसाच्या पानांपासून बनवलेली पत्रावळ म्हणजे एकेकाळी लग्न- मुंज-पूजा समारंभातील अविभाज्य भाग होती. अलिबाग तालुक्यातील कनकेश्वर जंगल परिसरात लोकांचा पत्रावळी बनवणे हा बारमाही व्यवसाय होता. मुंबईसारखी जवळच मोठी बाजारपेठ असल्याने बहिरोळे, मापगाव यांसारख्या गावांमध्ये घराघरांत पत्रावळी बनवण्याचा व्यवसाय चाले. यातून स्‍थानिकांनी आर्थिक उन्नत्तीही साधली होती; परंतु जंगलतोड, वणव्यांमुळे पळस नाहीसे झाले असून पत्रावळीही कालबाह्य झाल्या आहेत. पत्रावळ्या बनवणाऱ्या हजारो कारागिरांचा रोजगारही हिरावला आहे.

कनकेश्वर जंगलात पळसाची झाडे मोठ्या संख्येने आहेत. सकाळी घरातून निघून दुपारपर्यंत पानांचे दोन भारे आणण्याचे काम घरातील एखादा सदस्य करायचा. दुपारचे जेवण झाल्यावर पुन्हा जंगलाची वाट धरून जितकी पाने मिळतील तितकी आणण्याची धडपड असायची. याचदरम्यान घरातील वयस्कर माणसे, लहान मुले या पानांच्या पत्रावळ्या बनवायचे. हे काम रात्री उशिरापर्यंत चालायचे.

व्यापारी दारात येऊन तयार पत्रावळ्या मुंबईत घेऊन जायचे. यातून येथील कुटुंबांना चांगला रोजगार मिळत असे; परंतु प्लॅस्‍टिक आणि थर्माकोलच्या पत्रावळ्यांचा प्रवेश झाला आणि या उद्योगाला घरघर लागली. या पारंपरिक उद्योगाला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न करत नवनवे प्रयोग करण्यात आले. यंत्रावर वेगवेगळ्या आकाराच्या पत्रावळ्या बनवून बाजारात विकण्याचा प्रयत्न झाला.

तरीही या पर्यावरणपूरक पत्रावळी उद्योगास बळकटी मिळाली नाही. आता खेडोपाडीही होणाऱ्या छोट्या-मोठ्या लग्न समारंभात व इतर कार्यक्रमांतदेखील थर्माकोल व कागदाच्या तयार केलेल्या पत्रावळींनी जागा घेतली आहे. द्रोणाची जागा प्लॅस्टिकच्या द्रोणने घेतली आहे. सध्या समारंभांमध्ये कागदी पत्रावळी व द्रोणांचा जास्त वापर होताना दिसतो. कागदी किंवा थर्माकोलच्या पत्रावळींना केळीच्या पानांचा आकार दिलेला असतो.

पळसात आयुर्वेदिक गुणधर्म

जेवणासाठी वापरण्यात येणारी पळसाच्या पानांपासून तयार केलेली पत्रावळ आरोग्यासाठीही चांगली असल्याची ग्वाही आयुर्वेदातही देण्यात आली आहे. पुरातन काळापासून मंगल कार्यातील जेवण समारंभांसाठी पळसाच्या पानांपासून बनवलेल्या पत्रावळी व द्रोणाचा वापर होत असे. पळसाच्या पानांत आयुर्वेदिक गुणधर्म असल्याने अन्नपचन होण्यास मदत होते.

पळसाच्या पत्रावळी शिवण्यासाठी लिंबाच्या काडीचा वापर केला जातो. लिंबाच्या झाडालाही आयुर्वेदात महत्त्व आहे. विशेष म्हणजे, पळसाच्या पानांना कीडही लागत नाही. या पत्रावळी सहज उपलब्ध होतात. आता मात्र या स्वस्त व आयुर्वेदीय महत्त्व असलेल्या पत्रावळीच भोजन समारंभातून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: सोयाबीन भावात सुधारणा; कापूस तेजीतच, कांदा दबावातच, आल्याचे भाव टिकून तर शेवग्याला उठाव

Cotton Seed Shortage: सरळ कापूस वाण यंदाही अल्प

Agriculture Pump Cable Theft: केनवड शेतशिवारात केबल चोरट्यांचा धुमाकूळ

Monsoon 2026 : माॅन्सून ‘जैसा थे’ च, विदर्भात उष्णतेची लाट; माॅन्सूनच्या पुढील वाटचालीसाठी पोषक हवामान

Tree Plantation Campaign: वृक्षारोपण व्यापक लोकचळवळ

SCROLL FOR NEXT