Rural Agriculture Crime: रिसोड तालुक्यातील केनवड शेतशिवारात सध्या केबल चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, ५० हून अधिक शेतकरी या चोरीमुळे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. दिवसाआड होत असलेल्या या चोऱ्यांमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीती, संताप आणि असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, चोरटे इतके हुशार झाले आहेत, की शेतकऱ्यांच्या नेहमीच्या ये-जा मार्गालगत असलेल्या सोलर विहिरींनाही लक्ष्य करत मोटारींच्या केबल चोरून नेत आहेत..शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था पूर्णपणे या मोटारी आणि केबलवर अवलंबून असताना, अशा प्रकारच्या सततच्या चोरीमुळे शेतीची संपूर्ण गणिते कोलमडली आहेत. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेला असताना अनेक शेतकरी हळद लागवडीच्या तयारीत आहेत. .Agriculture Pump Cable Theft: सुकळी शेतशिवारातील लाखो रुपयांची केबल चोरी.मॉन्सूनपूर्व मशागतीसाठी आणि पिकांना वेळेवर पाणी देण्यासाठी सोलार विहिरींचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मात्र, ऐन हंगामाच्या तोंडावर केबल चोरी होत असल्याने शेतकऱ्यांना हजारो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागत आहे..Agriculture Pump Cable Theft : भराडी बंधाऱ्यानजीक कृषिपंपाच्या विद्युत केबलची चोरी.गेल्या काही दिवसांपासून केनवड परिसरात चोऱ्यांचे सत्र सातत्याने सुरू असून, अनेक शेतकऱ्यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ‘‘एकीकडे शेतीसाठी कर्ज काढून सोलार व्यवस्था उभी करायची आणि दुसरीकडे चोरटे रातोरात सर्व उद्ध्वस्त करून जात आहेत,’’ अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी व्यक्त करत आहेत. चोरीच्या घटनांमुळे अनेक शेतकऱ्यांच्या मोटारी बंद पडल्या असून, सिंचन व्यवस्था ठप्प झाली आहे. .महत्त्वाचे म्हणजे, वारंवार चोरीच्या घटना घडूनही पोलिस प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. चोरट्यांचा बंदोबस्त करण्यात पोलिसांना अपयश येत आहे. प्रशासन जबाबदारी झटकत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. दरम्यान, या चोरट्यांचा बंदोबस्त करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून जोर धरू लागली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.