Market Bulletin: सोयाबीनमध्ये सुधारणादेशातील बाजारात सोयाबीनच्या भावात आज काहीशी वाढ दिसून आली. सोयाबीनचे भाव मागील ५ दिवसांमध्ये काहीसे चढ उतारासह स्थिरावले होते. पण कालपासून सोयाबीनच्या भावात पुन्हा सुधारणा दिसून आली. सोयाबीन खरेदीचे भाव प्रक्रिया प्लांट्सनी आज १५० ते २०० रुपयांनी वाढवले होते. सोयाबीन खरेदीचा भाव ७ हजार ४०० ते ७ हजार ६०० रुपयांच्या दरम्यान पोचला आहे. वाढलेल्या भावात सोयापेंडला उठाव काहीसा कमी झाल्यामुळे दरवाढीवर दबाव येत आहे. त्यामुळे दरात काहीसे चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज सोयाबीन बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .कापूस तेजीतचदेशातील बाजारात कापसाच्या भावातील तेजी कायम आहे. कापसाला उठावही कायम आहे. सूत आणि कापसाची निर्यातही चांगली आहे. तर देशातील बाजारात कापडाला मागणीही टिकून आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातही कापसाचा भाव टिकून आहे. याचा आधार देशातील कापूस भावाला मिळत आहे. सीसीआयनेही कापूस विक्रीचा भाव आतापर्यंत १४ हजार रुपये प्रतिखंडीने वाढवला आहे. सध्या बाजार समित्यांमध्ये कापसाला प्रतिक्विंटल सरासरी ८ हजार ६०० ते ९ हजारांच्या दरम्यान भाव मिळत आहे. कच्च्या तेलामुळे पाॅलिस्टर महागले आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील स्थिती तेजीला पूरक असेपर्यंत देशातही कापसाचे भाव तेजीतच राहतील, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Kabuli Chana Price: काबुली हरभऱ्याचे दर खानदेशात टिकून.कांदा दबावातचदेशातील बाजारात कांद्याचा भाव दबावात आहे. कांद्याला मागील दोन महिन्यांपासून उत्पादन खर्चापेक्षा कमी भाव मिळत आहे. कांद्याची बाजारातील आवक सध्या चांगली सुरु आहे. याचा दबाव दरावर येत आहे. सध्या बाजारात कांदा प्रतिक्विंटल सरासरी ७०० ते १ हजार रुपयांच्या दरम्यान विकला जात आहे. वाढत्या उन्हामुळे कांदा साठवणुकीत अडचणी येत आहेत. कांदा सडण्याचे प्रमाणही वाढल्याचे शेतकरी सांगत आहेत. यामुळे कांद्याचा प्रश्न आणखी बिकट झाला आहे. कांदा बाजारावरील दबाव आणखी काही दिवस दिसू शकतो, असा अंदाज कांदा बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला आहे. .Fake Herbicide Sales: बनावट तणनाशक विक्रीवरून अॅमेझॉन, फ्लिपकार्टला नोटीस.आल्याचे भाव टिकून आल्याची बाजारातील आवक मागील काही दिवसांपासून काहीशी स्थिरावली आहे. लग्नसराईमुळे आल्याला चांगला उठाव होता. याचाही आधार दराला मिळाला. आल्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिर राहण्याची शक्यता आहे. यामुळे बाजारात आले सरासरी ५ हजार ते ६ हजार रुपयांच्या दरम्यान विकले जात आहे. आल्याला पुढील काळातही मागणी राहण्याची शक्यता आहे. तर आल्याच्या आवकेवर परिणाम होऊ शकतो, असा अंदाज आले बाजारातील जाणकारांनी व्यक्त केला आहे. .शेवग्याला उठावराज्यातील बाजारात मागील काही दिवसांपासून शेवग्याची बाजारातील आवक स्थिरावली आहे. आवकेचा दबाव कमी झाल्यामुळे भावातही काहीशी सुधारणा दिसून आली. शेवग्याला उठावही चांगला आहे. त्यामुळे शेवगा ४ हजार ते ५ हजार रुपये प्रतिक्विंटलच्या दरम्यान विकला जात आहे. शेवग्याची बाजारातील आवक पुढील काही दिवस स्थिरावण्याची शक्यता आहे. तर शेवग्याची मागणीही टिकून राहण्याचा अंदाज आहे. पाऊस सुरु झाल्यानंतर शेवग्याच्या आवकेवरही परिणाम होण्याची शक्यता भाजीपाला बाजारातील जाणकारांनी व्यक्त केली आहे. .ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.