APMC Market Agrowon
ॲग्रो विशेष

APMC Market : व्यापाऱ्यांचा माल ओट्यांवर, तर शेतकऱ्यांचा रस्त्यावर

Pre Monsoon Rain : अचानक आलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा रस्त्यावर टाकलेला शेतमाल भिजला.

Team Agrowon

Washim News : अचानक आलेल्या पूर्व मोसमी पावसामुळे येथील बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा रस्त्यावर टाकलेला शेतमाल भिजला. व्यापाऱ्यांचा माल ओट्यावर असल्याने नुकसान कमी झाले. ‘शेतकऱ्यांचा माल रस्त्यावर’ हे येथील बाजार समितीमध्ये नित्याचे झाले असून प्रशासनाविषयी शेतकरी रोष व्यक्त करीत आहेत.

बुधवारी (ता.आठ) सायंकाळी अचानक आलेल्या पूर्व मोसमी पावसाने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी आणलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीत तूर, सोयाबीन व मूग या पिकाची विक्री असल्या कारणाने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये हा शेतमाल विक्रीसाठी आणला होता.

दुपारपर्यंत हर्राशीची प्रक्रिया सुरू होती. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला व मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांच्या मालाचे नुकसान झाले. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांच्या शेतमाल टाकण्यासाठी मोठमोठे दोन टिनशेड उभारण्यात आले आहेत.

परंतु या शेडमध्ये व्यापारांच्या मालाचे ढीग कायम असतात. त्यामुळे शेतकऱ्यांचा शेतमाल हा विक्रीसाठी रस्त्यावर टाकावा लागतो. ही बाजार समिती शेतकऱ्यांची की व्यापाऱ्यांची असा प्रश्न या अनुषंगाने उपस्थित केला जात आहे.

‘‘कृषी बाजार समिती शेतकऱ्यांप्रती असलेल्या आडमुठ्या धोरणामुळे आमचा शेतमाल भिजला. त्यामुळे नुकसान झाले. या नुकसानीस कृषी उत्पन्न बाजार समिती जबाबदार आहे. प्रत्येकवेळी बाजार समिती व्यापाऱ्यांची बाजू घेते. शेतकऱ्यांना कोणी वाली दिसत नाही, अशी खंत भोकरखेडचे (ता. रिसोड) शेतकरी देवराव दगडूजी रंजवे यांनी व्यक्त केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mumbai APMC: मुंबई बाजार समितीच्या कारभाराची होणार चौकशी

Israel Lebanon Conflict: लेबनॉनमध्ये युद्धविराम नाही

White Grub Pest Management: हुमणी किडीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शन मोहीम

Central Government Policy: कांदा, साखर उद्योगांबाबत बुधवारपर्यंत केंद्र निर्णय घेईल : आमदार दिलीप वळसे पाटील

Soybean Oil Demand: अमेरिकेत जैवइंधनासाठी सोयातेलाचा वापर वाढता

SCROLL FOR NEXT