Tourism Guide Training Agrowon
ॲग्रो विशेष

Tourism Guide Training : ‘सारथी’ देणार पर्यटन मार्गदर्शनाचे प्रशिक्षण : अशोक काकडे

Managing Director Ashok Kakade : ग्रामीण भागातील पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी युवकांना टुरिस्ट गाइड प्रशिक्षण सारथीमार्फत देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितले.

Team Agrowon

Pune News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधून सारथी संस्थेमार्फत सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमांतर्गत राज्यातील ४७ गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

संस्थेचे अध्यक्ष अजित निंबाळकर व मान्यवरांच्या उपस्थित लाल महाल येथे छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊ माँसाहेब यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून सरदार हिरोजी इंदलकर सारथी किल्ले संवर्धन उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला.

ग्रामीण भागातील पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी युवकांना टुरिस्ट गाइड प्रशिक्षण सारथीमार्फत देण्यात येणार असल्याचे व्यवस्थापकीय संचालक अशोक काकडे यांनी सांगितले. स्वच्छता मोहिमेत संस्थेचे स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी, कौशल्य विकासअंतर्गत ‘एमकेसीएल’मध्ये प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी, सातारा व कोल्हापूर येथील शालेय विद्यार्थी अशा ८ हजार ५८६ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

सारथी संस्थेमार्फत प्राधिकृत १५ प्रशिक्षण संस्थांनीही यामध्ये सहभाग नोंदवला. रायगड, रायरेश्वर, शिवनेरी, पुरंदर, सिंहगड, राजगड, लालमहल, शनिवारवाडा, बालापूर, बदूर, खर्डा, देवगिरी, गाविलगड, किल्ले धारूर, माणिकगड, गोंडराजा, माहूरगड, प्रतापगड, वसंतगड, कल्याणगड (नंदगिरी), मल्हारगड,

सिंधुदूर्ग, भोईकोट, मच्छिंद्रगड, बाणूरगड, रामपूर, सिंदखेडराजा, रत्नदुर्ग, लिंगाणा, पन्हाळा, भुदरगड, विशाळगड, अजिंक्यतारा, चंदन, वंदन, रामशेज, नगरधनगड, तोरणा इत्यादी गड किल्यांवर ‘सप्तपदी स्वच्छतेची’ व ‘स्वच्छ भारत अभियान’अंतर्गत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

सारथी प्रायोजित एच. व्ही. देसाई कॉलेजच्या ३७० विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज शिवजन्मोत्सव सोहळा २०२४ रथोत्सव मार्गावर स्वच्छता मोहीम राबविली. तसेच छत्रपती संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात स्वछता करण्यात आली. सारथीचे संचालक उमाकांत दांगट, नवनाथ पासलकर, मधूकर कोकाटे, नानासाहेब पाटील, सारथीचे कर्मचारी या वेळी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: केळीला उठाव कायम; कापूस दर नरमले, गव्हाला उठाव, गवारचे दर तेजीतच तर मका कणसाचे भाव टिकून

Parliament Monsoon Session 2025: संसदेच्या पावसाळी अधिवेशनात अमित शाह यांनी मांडलेल्या विधेयकांवर; विरोधकांचा जोरदार निषेध

Sindhudurg Rain: सिंधुदुर्गात संततधार कायम; अनेक भागांत पूरस्थिती

Shirala Rain: शिराळा तालुक्यात पावसाचा जोर वाढला

Kolhapur Heavy Rainfall: कोल्हापूर जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे अनेक मार्ग बंद 

SCROLL FOR NEXT