Pomato Agrowon
ॲग्रो विशेष

Pomato : एकाच झाडावर टोमॅटो, वांगी आणि बटाटेही

वाराणसी येथील भाजीपाला संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी एकाच झाडाला वांगी, टोमॅटो आणि बटाटे उत्पादित करण्याची किमया साधली आहे.

Team Agrowon

पिकांचे उत्पादन वाढविण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब केला जातो. पारंपारिक पद्धतीत बदल करुन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आता वाढू लागला आहे. यामध्ये नवीन पिकांच्या जाती विकसित करण्यावर शास्त्रज्ञांचा भर असतो. वाराणसी येथील भाजीपाला संशोधन संस्थेतील शास्त्रज्ञांनी एकाच झाडाला वांगी, टोमॅटो आणि बटाटे उत्पादित करण्याची किमया साधली आहे.  कलम तंत्राचा वापर करुन हे साध्य झाले आहे. आतापर्यंत केवळ झाडांमध्ये कलम तंत्राचा (Vegetable Grafting) वापर केला जायचा. पण हे तंत्र आता भाजीपाला पिकामध्येही वापरले जात आहे. 

कलम करताना रुटस्टॉक म्हणून वांग्याच्या रोगप्रतीकारक रोपाची निवड केली आहे. 

रोपवाटीकेमध्ये २४ ते २८ अंश सेल्सिअस तापमानाला ८५ टक्क्यांपेक्षा जास्त आर्द्रतेमध्ये ही कलमे वाढवली.  

कलम केलेल्या रोपांची १५ ते २० दिवसांनी शेतात लागवड करण्यात आली. योग्य प्रमाणात खत, पाणी आणि रोपांची छाटणी केल्यानंतर या रोपांपासून ६० ते ७० दिवसांनी फळे मीळायला सुरुवात होते.

या रोपांना जमिनीखाली मुळावर बटाटे आणि खोडाच्यावर टोमॅटो लागतात ज्याला पोमंटो असे नाव देण्यात आले आहे. 

एकाच झाडापासून ३ कीलो वांगी आणि २ किलो टोमॅटो मिळतात. 

भाजीपाला पिकामध्ये कलम तंत्राचा वापर २०१३ -१४ मध्ये सुरू झाला. ज्या ठिकाणी जागा कमी आहे याशिवाय ज्यांना बाजारातील रासायनिक अवशेषयुक्त भाज्या खायच्या नाहीत त्यांच्यासाठी हे तंत्र फायदेशीर ठरु शकेल असे संस्थेचे संचालक डॉ जगदीश सिंह म्हणाले. टेरेस गार्डनची आवड असलेल्या लोकांसाठी ही कलमी रोपे शहरी भागातील नर्सरी व्यावसायीकांना प्रशिक्षण देऊन देण्यात येतील. जेणेकरून सामान्य लोकांना ही रोपे मिळतील. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Sugar Factory: राज्यात ७४ साखर कारखान्यांची धुराडी पेटली; पहिल्या सप्ताहात २५ लाख टन गाळप

Rabi Season Preparation: दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामाची तयारी; कृषी विभागाकडून रब्बीचे ६४ लाख हेक्टरवर नियोजन

Paddy Price: गोंदिया जिल्ह्यात धानाच्या दरात तेजी? भाव पोहोचले ४ हजार ५०० रुपयांवर

Agristack Farmer ID: देशात ११ कोटी फार्मर आयडी तयार; पाच महिने आधीच लक्ष्य पूर्ण, कृषिमंत्र्यांची माहिती

Maharashtra Weather: वादळी प्रणालीमुळे विदर्भासह राज्यात पावसाला पोषक हवामान

SCROLL FOR NEXT