Tomato Rate
Tomato Rate agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Rate : टोमॅटोचे दर उतरलेलेच, मेथीच्या दरात वाढ, पावसाचा भाजीपाला मार्केटवर असा परिणाम

sandeep Shirguppe

Rains Vegetable Market : मागच्या दोन महिन्यातील खाद्यतेलाचा चढता आलेख आता पुन्हा कमी होत आहे. या आठवड्यात तेलाचे दर २ ते ३ रुपयांनी स्वस्त झाले आहेत. याचबरोबर धान्यबाजारातही अशीच परिस्थिती दिसून येत असून, धान्याचे दरात चढउतार सुरूच आहे. बाजरी, गहू आणि डाळींना या महिन्यात मोठी मागणी वाढू लागली आहे. तसेच झेंडू, निशिगंध, गुलाबाला सध्या बाजारात चांगला दर मिळत असल्याने फूल उत्पादक शेतकऱ्यांना चांगला दर मीळत आहे.

भाजीपाला बाजारात आवक आणि मागणीनुसार भाजीपाल्याला दर मिळत आहे. वादळी पावसामुळे बाजार समितीत आवक कमी होत आहे. मेथी, कोथिंबीरचे भाव २० रुपयांपर्यंत होते. बिन्सचा तुटवडा असून, किलोला ४० ते ५० रुपयांची मोठी वाढ झाली आहे. लग्नसमारंभामुळे बिन्सला मागणी अधिक आहे. फळबाजारात कलिंगडाची आवक कमी झाली आहे. तसेच सफरचंद, डाळिंबाचा तुटवडा आहे. मोसंबीची नव्याने आवक सुरू झाली आहे. कच्च्या तोतापुरी कैरीची आवक वाढली आहे.

प्रति किलो रुपये भाजीपाला : टोमॅटो- १० ते १५, दोडका- ५० ते ६०, वांगी - ७० ते ८०, कारली- ४० ते ५०, ढोबळी मिरची- ६० ते ८०, मिरची -८० ते ९०, फ्लॉवर - ३० ते ४०, कोबी- १५ ते २०, बटाटा- २५ ते ३०, कांदा - २० ते २५, लसूण- १८० ते २००, आले- १०० ते १२०, लिंबू - ३०० ते ६०० शेकडा, गाजर - ३० ते ४०, बिन्स- १६० ते १८०, गवार -८० ते १००, वरणा शेंग - ६० ते ८०, भेंडी- ५० ते ६०, काकडी- ३० ते ५०, दुधी - २० ते ३०, हिरवा वाटाणा -७० ते ८०, पालेभाज्या - १२ ते १५, कोथिंबीर, मेथी (पेंढी) - २० ते २२, शेवगा - २ ते ३ रुपये नग.

फुले : झेंडू - १२० ते १५०, निशिगंध - ३०० ते ३५०, गुलाब - २८० ते ३००, गलांडा - १०० ते १२०, शेवंती १८० ते २००.

फळे : सफरचंद - २५० ते ४००, संत्री - १२० ते १३०, मोसंबी- १०० ते १२०, डाळिंब- १२० ते २००, चिकू- ६० ते ८०, पेरू- ५० ते ८०, खजूर -१५० ते २००, पपई- ४० ते ५०, मोरआवळा -१०० ते १२०, सीताफळ - ८० ते १००, कलिंगड - ५० ते ६०, टरबूज -४० ते ६०, केळी - ५० ते ६० डझन, देशी केळी - ७० ते ८० डझन, किवी - १४० ते १५०, चिंच-१०० ते १४०, अननस -४० ते ५०, अंजीर -८०-१००.

खाद्यतेल : सरकी - १०८ ते ११२, शेंगतेल - १७४ ते १८०, सोयाबीन - १०८ ते ११२, पामतेल - १०८ ते ११४, सूर्यफूल - १०८ ते ११२.

कडधान्य : हायब्रीड ज्वारी- ३१ ते ३७, बार्शी शाळू- ३२ ते ५५, गहू - ३२ ते ४०, हरभराडाळ - ७८ ते ८३, तूरडाळ- १५५ ते १६५, मूगडाळ - ११० ते ११५, मसूरडाळ - ७८ ते ८२, उडीदडाळ - १२२ ते १३०, हरभरा- ७०, मूग- १०० ते ११०, मटकी- १०० ते ११०, मसूर- ७०, फुटाणाडाळ - ८३ ते ८५, चवळी- ८८, हिरवा वाटाणा- ९०, छोला -१४० ते १६०.

टोमॅटोची लाली उतरलेलीच

उन्हाळा सुरू झाला की टोमॅटोला चांगलाच दर येतो. आवकही कमी होते आणि मागणीही वाढते. मात्र यंदा चित्र उलटे आहे. दीड महिन्यापासून टोमॅटोचा दर जैसे थे आहे. उन्हामुळे माल खराब होत असला, तरी दर पडलेलेच आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing : सांगली जिल्ह्यात अडीच लाख हेक्टरवर होणार खरिपाचा पेरा

Jal Jivan Mission : निधी खर्च केला, पण गावांत पाणीच नाही

Maharudra Mangnale : कडूनिंबांशी दोस्ती ! : महारुद्र

Illegal Cotton Seed : ३१ लाखांचे अवैध एचटीबीटी कापूस बियाणे जप्त

Food Safety India : एफएसएसएआयचा 'कॅल्शियम कार्बाइड'च्या वापराबाबत इशारा; वापर टाळण्याच्या केल्या सूचना

SCROLL FOR NEXT