Tomato Agrowon
ॲग्रो विशेष

Tomato Market : दिंडोरी बाजार समितीसमोर रस्त्यावर ओतला टोमॅटो

Tomato Rate : टोमॅटो पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकेरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. खर्च लाखात मात्र उत्पन्न रुपयांत, अशी सध्या अवस्था आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

Team Agrowon

Nashik News : सध्या टोमॅटोला भाव नसल्याने शेतकरी मेटाकुटीस आला असून, केलेला खर्च निघत नसल्याने संप्तत शेतकऱ्यांनी गुरुवारी (ता. ५) दिंडोरी बाजार समितीच्या मुख्य बाजार आवारासमोरील नाशिक-कळवण रस्त्यावर टोमॅटो ओतून शासनाचा निषेध केला. यामुळे काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.

दिंडोरीचे पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, बाजार समितीचे उपसभापती कैलास मवाळ यांनी आंदोलनस्थळी शेतकऱ्यांची समजूत काढली. त्यानंतर टोमॅटो खरेदी-विक्री सुरळीत सुरू झाली.

टोमॅटो पीक घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकेरी दीड लाखापर्यंत खर्च येतो. खर्च लाखात मात्र उत्पन्न रुपयांत, अशी सध्या अवस्था आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे.

तालुक्यातील लोकप्रतिनिधी टोमॅटोला भाव नाही, अशी चर्चा करतात. प्रत्यक्षात त्याबाबत कुणीही शासन दरबारी आवाज उठवत नाही. दोन दिवसांपासून टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक वाढली असून, भावही कोसळले आहेत.

गुरुवारी दुपारी साडेचारच्या सुमारास मोठ्या प्रमाणात टोमॅटो आवक झाली. मात्र, खरेदीदार नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी नाशिक-कळवण रस्त्यावर टोमॅटो ओतून शासनाचा निषेध केला.

मोठ्या प्रमाणात रस्त्यावर टोमॅटोचे ट्रॅक्टर आल्याने वाहतूक दुतर्फा ठप्प झाली. याबाबत माहिती मिळताच पोलिस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, बाजार समितीचे उपसभापती कैलास मवाळ यांनी घटनास्थळी धाव घेत शेतकऱ्यांची समजूत काढली व सर्व वाहने बाजार समिती आवारात घेण्याची विनंती केली. त्यानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली.

बाजार आवारात शेतकरी व व्यापाऱ्यांशी चर्चा करत व्यवहार सुरळीत करण्यात आले. सरकार शेतीमालाचे भाव वाढले की लगेच हस्तक्षेप करत निर्यातबंदी करून आयात करते. आता भाव कोसळले असताना, सरकार का उपाययोजना करीत नाही, असा सवाल शेतकऱ्यांनी केला. वसंत थेटे, वलखेडचे सरपंच विनायक शिंदे, राकेश शिंदे, प्रभाकर जाधव, चिंटू पाटील, सचिन मेधणे, विठ्ठलराव अपसुंदे यांमच्यासह शेतकरी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT