Seed Subsidy Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Subsidy: शंभर टक्के अनुदानावरील बियाणे मागणीचा आज शेवटचा दिवस

Seed Scheme Last Date: राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व अधिक आहे.

Team Agrowon

Ahilyanagar News: राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानअंतर्गत पिकांच्या उत्पादकता वाढीसाठी व बियाणे बदलाचे महत्त्व अधिक आहे. त्या अनुषंगाने सुधारित व संकरित वाणांच्या प्रसाराच्या दृष्टीने प्रमाणित बियाणे वितरण व पीक प्रात्यक्षिकाचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.

त्यासाठी शंभर टक्के अनुदानावर बियाणे मागणीसाठी आजचा (ता. ४) शेवटचा दिवस असून शेतकऱ्यांनी बियाणे मागणीसाठी अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी सुधाकर बोराळे यांनी केले आहे.सुधाकर बोराळे यांनी सांगितले, की प्रमाणित बियाणे वितरण या घटकांतर्गत आर्थिक सहाय्य प्रति शेतकरी कमाल १ हेक्टरच्या मर्यादित आहे.

पीक प्रात्यक्षिक ही बाब शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांच्याद्वारे राबविण्यात येणार आहे. त्यासाठी शेतकरी गट हा ३१ मार्च २०२४ पूर्वी आत्मा, महाराष्ट्र ग्रामीण जीवनोत्ती अभियान, राष्ट्रीय ग्रामीण जीवनोत्ती अभियान, महिला आर्थिक विकास महामंडळ, नाबार्ड यांच्याकडे नोंदणीकृत असावा.

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानातून तूर, मूग उडदाचे दहा वर्षांच्या आतील ५ हजार रुपये अनुदानावर व १० वर्षांवरील २५०० रुपये प्रती क्विटंल अनुदानावर तर राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातून शेतकऱ्यांना सोयाबीन व भुईमूग प्रमाणित बियाणांचे शंभर टक्के अनुदानावर शंभर अनुदानावर वितरण केले जात आहे.

संकेतस्थळावर अर्ज करावेत

राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानातून तूर, मूग, उडीद, भात, बाजरी, नाचणी, वरई व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानातून सोयाबीन व भुईमुगाचे प्रात्यक्षिकांसाठी शेतकरी गट, शेतकरी उत्पादक कंपनी आणि कृषी क्षेत्रात काम करणारी सहकारी संस्था यांना शंभर टक्के अनुदान बियाणे दिले जात आहे. बियाणे मागणीसाठी ४ जून शेवटची तारीख असल्याने शेतकरी, संस्थांनी बियाणे मागणीसाठी mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर सादर करावेत. अर्ज करावेत असे आवाहन सुधाकर बोराळे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT