Agriculture Input Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Input Subsidy : निविष्ठांचे अनुदान मिळण्यासाठी अर्ज करण्याचा आजचा शेवटचा दिवस

Last Day to Apply for Subsidy : राज्याच्या रब्बी हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असून पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना निविष्ठांकरिता अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आज (ता.६) शेवटचा दिवस आहे.

Team Agrowon

Pune News : राज्याच्या रब्बी हंगामाची पूर्वतयारी सुरू झाली असून पीक प्रात्यक्षिकांसाठी शेतकऱ्यांना निविष्ठांकरिता अनुदान मिळणार आहे. त्यासाठी ऑनलाइन अर्ज करण्यासाठी आज (ता.६) शेवटचा दिवस आहे.

कृषी आयुक्तालयाच्या विस्तार विभागाचे उपसंचालक शिवकुमार सदाफुले यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतकऱ्यांना निविष्ठांच्या अनुदानासाठी आजपर्यंत (ता.६) ऑनलाइन अर्ज दाखल करता येणार आहेत. २०२४-२५ मधील रब्बी हंगाम नियोजनाचा भाग म्हणून अन्न आणि पोषण सुरक्षा, अन्नधान्य पिके व राष्ट्रीय खाद्य तेल अभियान, गळीतधान्य पिके या उपक्रमांमधून पीक प्रात्यक्षिके घेतली जाणार आहेत.

त्यापैकी हरभरा, गहू, जवस, करडई, भुईमूग व मोहरी या पिकांकरिता अनुदान मिळणार आहे. महाडीबीटी प्रणालीद्वारे mahadbt.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर बियाणे घटकासाठी सध्या ऑनलाइन अर्ज स्वीकारले जात आहेत.

पीक प्रात्यक्षिके शेतकरी गटांमार्फत राबविली जाणार आहेत. प्रात्यक्षिकासाठी एका शेतकऱ्याला एक एकर मर्यादेत निविष्ठा स्वरूपात अनुदान मिळेल. प्रमाणित बियाणे वितरणासाठी एका शेतकऱ्याला कमाल दोन हेक्टरसाठी बियाणे मिळेल. निविष्ठांचा पुरवठा करण्याकरिता लाभार्थ्यांची निवड संकेतस्थळावर केलेल्या अर्जातून ऑनलाइन पद्धतीने करण्यात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

MAGNET Project: शेतमालाचे मुल्यवर्धन, साठवणूक क्षमता वाढीसाठी साहाय्य; ९३ कोटी निधी मंजूर

Fake Seeds: बनावट बियाणे विक्रीला जरब

Farm Road Crisis: शेतरस्त्यासाठी शेतकरी पितापुत्राचा आत्मदहनाचा प्रयत्न

Water Conservation: जलस्रोतांसाठी व्यापक उपाययोजना करा

PM Kisan Scheme: ‘पीएम किसान’साठी ‘ॲग्रीस्टॅक’ बंधनकारक

SCROLL FOR NEXT