Banana Seedling  Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Tissue Culture : नांदेडला केळी टिश्यू कल्चर सेंटर मंजूर करा

Banana Farming : जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. केळी उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले तर त्यांच्या उत्पादनात अधिक वाढ होईल.

Team Agrowon

Nanded News : केळी उत्पादनाचा दर्जा उत्पादकता वाढविण्यासाठी नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर मंजूर करण्याची मागणी भोकरच्या आमदार श्रीजया चव्हाण यांनी मंगळवारी (ता. ८) विधानसभेत केली.

जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात केळीची लागवड केली जाते. केळी उत्पादकांना आधुनिक तंत्रज्ञान उपलब्ध करून दिले तर त्यांच्या उत्पादनात अधिक वाढ होईल. त्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड जिल्ह्यात केळीचे टिश्यू कल्चर सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाला सादर केला आहे.

त्याला मान्यता देऊन आवश्यक त्या निधीची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत सहभागी होताना केली. या टिश्यू कल्चर सेंटरच्या मागणीसाठी खासदार अशोक चव्हाण यांनी देशाचे गृहमंत्री अमित शाह व राज्य शासनाकडे पाठपुरावा केला आहे.

आमदार श्रीजया चव्हाण यांनी माध्यमिक स्तरावरील विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जनजागृती व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये कायद्याबाबत जनजागृती करण्यासाठी नांदेडचे पोलिस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी ‘मिशन निर्भया’ म्हणून एक उत्तम उपक्रम सुरू केला आहे.

या उपक्रमाची संपूर्ण राज्यात अंमलबजावणी करण्याची मागणी त्यांनी केली. कृष्णूर ते मारतळा दरम्यान मारतळा, कुंभारगाव व कापशी परिसरात औद्योगिक वसाहत स्थापन करण्यासाठी भूसंपादनाचा प्रस्ताव शासनाला सादर झालेला आहे.

औद्योगिक वसाहतीसाठी उद्योजक आग्रही असून, याबाबतचा प्रस्ताव मान्य करून भूसंपादनासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी आमदार श्रीजया चव्हाण यांनी पुरवणी मागण्यांवरील चर्चेत मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tractor Sales : ट्रॅक्टरची विक्रीने सलग तीन महिन्यात ओलांडला एक लाखांचा टप्पा; मॉन्सून आणि खतांच्या टंचाईचा होणार परिणाम?

Cotton Crop Management: ‘एल निनो’च्या पार्श्वभूमीवर कापूस व्यवस्थापन

Congress Protest: शेतकरी प्रश्नी काँग्रेस आक्रमक, छत्रपती संभाजीनगरमध्ये रास्तारोको, ५ किमीपर्यंत वाहनांच्या रांगा

Global Food Security: जागतिक अन्नसुरक्षेला धक्का बसणार?

Dairy Farming Success Story: दूध व्यवसायाला दिली मूल्यवर्धनाची जोड

SCROLL FOR NEXT