Kadus Agriculture Ggroup Collective Farming: कृषी विभागाच्या मार्गदर्शनानंतर कडूस (ता. खेड) येथे कृषी गटाच्या शेतकऱ्यांनी ‘सामूहिक शेती’चा नावीन्यपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. गटाच्या माध्यमातून एकत्रित आलेल्या २८ शेतकऱ्यांनी सुमारे ३५ एकर क्षेत्रावर सुधारित तंत्रज्ञान बीबीएफ साहाय्याने सामूहिक पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली आहे. गटातील शेतकऱ्यांची मिळून सुमारे २५ हजार रुपयांपेक्षा जास्त बचत होईल, अशी अपेक्षा सहायक कृषी अधिकारी ज्योती राक्षे यांनी व्यक्त केली..एकत्रित येऊन सामूहिक शेती केली तर फायद्याची ठरेल, यासाठी कृषी विभागाच्या राक्षे यांनी कडूस येथील शेतकऱ्यांना प्रोत्साहित केल्यानंतर भैरवनाथ कृषी गट व कडूस प्रगत कृषी गटाच्या शेतकऱ्यांनी सामूहिक शेतीसाठी पुढाकार घेतला आहे. मार्गदर्शनासोबत आवश्यक ती मदत पुरविण्याची शाश्वती राक्षे यांनी दिल्यानंतर शेतकऱ्यांनी हा उपक्रम हाती घेतला आहे..Group Farming: समूह शेतीचा स्वीकार करण्याचा प्रयत्न करावा : डॉ. प्रसाद देवधर.पहिल्या टप्प्यात गटातील २८ शेतकऱ्यांनी सुमारे ३५ एकर क्षेत्रावर बीबीएफ तंत्राच्या साहाय्याने शास्त्रशुद्ध पद्धतीने सोयाबीनची पेरणी केली आहे. यासाठी शेतकऱ्यांना पेरणीचे साहित्य उपलब्ध करून देण्यात आले होते. पेरणीपूर्वी बियांची उगवण क्षमता तपासण्यात आली. बीज प्रक्रियेनंतर पेरणी करण्यात आली..Natural Farming: शेलगावच्या शेतकऱ्यांनी अनुभवले गोवंशाधारित नैसर्गिक शेती तंत्रज्ञान.या वेळी अध्यक्ष दिलीप ढमाले, सचिव संतोष गारगोटे, व्यवस्थापक किसन गारगोटे, रमेश शेळके रत्नाकर डांगले, संदीप धायबर, शिवाजी बंदावणे, मनोहर बंदावणे, सखाराम बंदावणे, माऊली तुपे, किशोर हुरसाळे व गटातील शेतकरी उपस्थित होते. गटाच्या वतीने टोकन मशीन खरेदी करण्यात आले आहे..पेरणीसह बियाणे, तणनाशक, खते व कीटकनाशकांच्या एकत्रित खरेदीसह ड्रोनच्या मदतीने फवारणीचे नियोजन करण्यात आले आहे. यातून सुमारे २५ हजार रुपयांची बचत होणार आहे. ड्रोनची खरेदी गटाच्या वतीने करण्यात येणार असल्याची माहिती अध्यक्ष ढमाले यांनी दिली..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.