Marathwada Mukti Sangram Agrowon
ॲग्रो विशेष

Marathwada Development : मराठवाड्याची कालबद्ध प्रगती हेच ध्येय्य

Team Agrowon

Chh. Sambhajinagar News : कृषी, दळणवळण, उद्योगविकास त्यातून रोजगार निर्मिती, पायाभूत सुविधा विकास अशा सर्व क्षेत्रात मराठवाड्याची कालबद्ध प्रगती करणे हेच शासनाचे ध्येय्य असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. स्थानिक सिद्धार्थ उद्यानात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रमात मुख्यमंत्री श्री. शिंदे बोलत होते.

या सोहळ्यास विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, राज्यसभा सदस्य खासदार डॉ. भागवत कराड, लोकसभा सदस्य खासदार संदीपान भुमरे, खासदार कल्याण काळे, विधानसभा सदस्य आमदार प्रदीप जयस्वाल, आमदार प्रशांत बंब, आमदार संजय शिरसाट, आमदार उदयसिंग राजपूत, माजी खासदार चंद्रकांत खैरे, अप्पर मुख्य सचिव विकास खारगे, विभागीय आयुक्त दिलीप गावडे, मनपा आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना, पोलिस महानिरीक्षक वीरेंद्र मिश्र, पोलिस आयुक्त प्रवीण पवार, पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड तसेच स्वातंत्र्य सैनिक, त्यांचे कुटुंबीय व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. ध्वजवंदननंतर राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, की अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी मराठवाडा मुक्ती संग्राम अजरामर केला. मराठवाड्याच्या स्वातंत्र्यलढ्याची स्मृती जपण्यासाठी गेल्या वर्षी स्मृती स्मारक उभारण्यासाठी १०० कोटी रुपये निधी दिला. तसेच मराठवाड्यातील प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा नियोजन निधीतून प्रत्येक जिल्ह्याला दोन कोटी रुपये दिले.

मराठवाड्यातला दुष्काळ हटविण्यासाठी नद्यांचे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्याकरिता सुमारे १५ हजार कोटी रुपयांच्या योजनेचा प्रकल्प अहवाल तयार होतोय देव आणि देवस्थानांच्या विकासासाठी २७५ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. नाबार्डच्या मदतीने रस्त्यांची ४४ कामे होत आहेत. हायब्रीड अॅन्यूटी योजनेतून १०३० कि. मी. लांबीचे रस्ते सुधारताहेत.

मराठवाड्यातल्या ७५ ग्रामपंचायतींच्या कार्यालयांसाठी बांधकामे सुरू आहेत. त्यांना भारतनेटद्वारे जोडले जात आहे. छत्रपती संभाजीनगरसाठी शहरासाठी सर्वांत महत्त्वाच्या २७४० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेचे काम सुद्धा आहे. ग्रामीण महिलांच्या सक्षमीकरणासाठी १०७६ कोटींची वाढीव तरतूद केली.

त्याचा लाभ मराठवाड्यातील १२ लाखांपेक्षा जास्त महिलांना लाभ होतोय. मराठवाड्यात ४ लाख विहिरीची कामे सुरू आहेत. दुग्ध विकासाला गती देण्यासाठी आठही जिल्ह्यात दुग्ध विकास प्रकल्प टप्पा-१ हा २०२७ पर्यंत राबवला जाईल. त्यासाठी एनडीडीबी आणि मदर डेअरी सहकार्य करणार.

मराठवाड्याच्या विकासासाठी तरतूद

  • छत्रपती संभाजी नगर – गोदावरी काठावरच्या २०० देवस्थानांना जोडणारा सर्वज्ञ अष्टशताब्दी मार्ग - २३४ कोटींची तरतूद.

  • जालना येथे रेशीम पार्क व प्रशिक्षण केंद्र स्थापन करणार- २५ कोटी.

  • परभणी- गंगाखेड येथील संत जनाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला मंजुरी,त्यासाठी ५० कोटी.

  • नांदेड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र माहूरगड हे शक्तिपीठ. याठिकाणच्या सुधारित विकास आराखड्यास मान्यता. नव्याने करावयाच्या व अत्यावश्यक कामांसाठी ८२९ कोटी १३ लाखांची मंजुरी.

  • हिंगोली जिल्ह्यातील श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याच्या दुसऱ्या टप्प्यासाठी ४५ कोटी १४ लाख.

  • बीड जिल्ह्यातील परळी वैजनाथ येथील आयटीआयमधील अल्पसंख्याक तुकड्यांसाठी नवीन कार्यशाळा बांधण्यासाठी १५ कोटी.

  • धाराशिव मधील सोनारी भैरवनाथ देवस्थान, परांडा येथील विकास आराखड्यासाठी १८६ कोटींना मंजुरी.

  • लातूर जिल्ह्यातील धनेगाव व चाकूर येथील मुलींची शासकीय निवासी शाळा. या शाळांसाठी ५० कोटी.

४६ रुपयांचे काम दाखवा एक लाखाच बक्षीस घ्या ः दानवे

गतवर्षी छत्रपती संभाजीनगरात मराठवाडा विभागाचा अनुशेष भरून काढण्यासाठी मंत्रिमंडळ बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी ४६ हजार कोटी रुपयांची विकासात्मक कामांची घोषणा केली होती. एक वर्षानंतर यापैकी ४६ रुपयांचे तरी काम दाखवा आणि १ लाख रुपयाचे बक्षीस घ्या, असे आव्हान शिवसेना नेते तथा विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्र्यांना दिले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Soybean Crop : वाढलेल्या सोयबीनमध्ये शेंगांचा शोध

Agricos Welfare Society : ‘कृषी’च्या विद्यार्थ्यांकडून सेवाभावी संस्थेला मदत

E-Peek Pahani : छप्पन टक्के शेतकऱ्यांनी नोंदविली ई-पीकपाहणी

Crop Damage Compensation : नांदेडमधील शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई

Integrated Agriculture : एकात्मिक शेती पद्धतीच्या यशस्वी मॉडेलचा प्रसार व्हावा

SCROLL FOR NEXT