Kolhapur Farmers agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Farmers : वाघ, टस्कर, बिबट्या, गव्यांचा धुमाकूळ, कोल्हापुरातील शेतकरी हैराण, वनविभागाची बघ्याची भूमिका

Animal Crop Dmage : तक्रार देऊनही वन विभाग कसलीही कारवाई करत नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थ शेतकऱ्यांना दाद कोणाकडे मागायची हाच प्रश्न पडला आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Animal Department : कोल्हापूर जिल्ह्यात जंगली जनावरांचा वावर नागरीवस्ती आणि शेतीमध्ये वाढला आहे. मागच्या काही महिन्यांपासून चंदगड तालुक्यात वाघ, टस्कर तर शाहूवाडी आणि पन्हाळा तालुक्यात गवे आणि बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी भयभीत झाले आहेत. टस्करांचा वावर नित्याचा झाल्याने कधी ऊस तर कधी वाहनांची तोडफोड अशा घटना वांरवार होत आहेत. याबाबत तक्रार देऊनही वन विभाग कसलीही कारवाई करत नसल्याने जिल्ह्यातील अनेक गावातील ग्रामस्थ शेतकऱ्यांना दाद कोणाकडे मागायची हाच प्रश्न पडला आहे.

चंदगड तालुक्यात वाघ आणि टस्कराचा धुमाकूळ

चंदगड तालुक्यातील शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, टस्कराचा वावर पेद्रेवाडी परिसरात असून, काळामा मंदिराच्या जंगलात त्याचे वास्तव्य आहे. सायंकाळच्या वेळी तो जंगलातून उतरतो. हा त्याचा दिनक्रम ठरला असून, त्याच्या वावराने पेद्रेवाडी परिसरात भीतीचे वातावरण आहे. दरम्यान, काल (ता.२८) रात्री त्याने साडेदहा वाजता भैरू संतू शिवगण यांची शेतातील घराशेजारी लावलेली दुचाकी चेंडूसारखी खेळवत नेली. त्याचबरोबर बाळू डोंगरे यांच्या केळीच्या बागेचे नुकसान केले.

गेली महिनाभर पेद्रेवाडी, कोवाडे व मलिग्रे परिसरात टस्कराचा वावर आहे. त्याच्याकडून ऊस, बांबू पिकाचे नुकसान सुरू आहे. काही शेतकऱ्यांच्या पाण्याच्या टाक्या, जलवाहिन्या यांचे नुकसान केले आहे. टस्कराच्या उपद्रवाने शेतकरी हवालदिल झाला असून, वनविभागाने त्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे. शिवगण यांची दुचाकी तुडवून चेपली असून, सुमारे पन्नास हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

हत्तीप्रवण क्षेत्रातील ऊस उचलावा

टस्कर वावरत असलेल्या क्षेत्रातील उसाचे मोठे नुकसान होत आहे. या परिसरातील ऊस साखर कारखान्याने उचलावा, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष संजय देसाई यांनी केली आहे.

गवसे परिसरात वाघाचा वावर

गवसे (ता. आजरा) येथील परिसरात वाघाचा वावर आहे. गवसे तलावातील दलदलीमध्ये त्याचे ठसे मिळून आले. त्याच्या वावराने परिसरात भीतीचे वातावरण आहे. चाळोबा जंगल, किटवडे परिसरात गेली दोन महिने वाघ वावरत आहेत. त्यांने जंगलात रेडे व वन्यप्राण्यांची शिकार केली आहे. दोन दिवसांपूर्वी गवसे परिसरात वाघाच्या डरकाळीचे आवाज ग्रामस्थांना ऐकण्यास मिळाले. त्याच्या पावलाचे ठसे गवसे तलावातील दलदलीत मिळून आले आहेत. वन विभागाने याबाबत दुजोरा दिला आहे. त्याने जंगलात कुठे शिकार केली आहे का, याचा शोध घेतला जाणार आहे.

पन्हाळा तालुक्यात गव्यांचा धुमाकूळ

मल्हारपेठ (ता. पन्हाळा) येथे लोकवस्तीत मंगळवारी (ता.२८) सकाळी रानगवा घुसल्याने एकच खळबळ उडाली. यामुळे धामणी खोऱ्यातील मल्हारपेठ, सावर्डे, मोरेवाडी, नवलेवाडी, वाघुर्डे परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे. सकाळी सातच्या सुमारास हा गवा नानाचा टेक परिसरातून कळे - मल्हारपेठ या मुख्य रस्त्यावर आला. तेथून तो मल्हारपेठच्या मुख्य चौकात आला. या ठिकाणी गावातील नागरिकांनी गव्याला लोकवस्तीतून हुसकावून बाहेर काढले. याबाबत वन विभागाकडून कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Bachhu Kadu : शेतकरी प्रश्‍नांना बगल देत धार्मिक, जातीय मुद्यांचा वापर

Dam Water Release : नाशिकमध्ये ११ धरणांतून विसर्ग सुरू

Mahakrishi App Issue : 'कृषी'च्या कर्मचाऱ्यांचे मार्गदर्शन कमी-नोंदी जास्त

Ajit Pawar : ‘माळेगाव’च्या अध्यक्षपदी उपमुख्यमंत्री अजित पवार

Ind-US Trade Deal : देशाचे हित साधले जाईल तेव्हाच करार होईल

SCROLL FOR NEXT