Ginger
Ginger Agrowon
ॲग्रो विशेष

Ginger Research Center : प्रस्तावित आले संशोधन केंद्र सुरू व्हावे यासाठी तीन महिन्यात प्रक्रिया

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथील प्रस्तावित आले संशोधन केंद्र सुरू व्हावे यासाठी तीन महिन्यात याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.

या केंद्रासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी घोषणा कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Agriculture Minister Abdul Sattar) यांनी सोमवारी ( ता. २०) विधान परिषदेत केली. यासंदर्भात आ.सतीश चव्हाण सातत्याने पाठपुरावा करीत आहेत.

खुलताबाद तालुक्यातील गल्ले बोरगाव येथे आले संशोधन केंद्र स्थापन करावे यासाठी आ. चव्हाण शासनस्तरावर वेळोवेळी पाठपुरावा करीत होते.

नागपूर येथे झालेल्या हिवाळी अधिवेशनात देखील त्यांनी यासंदर्भात तारांकित प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आले/मसाले पीक संशोधन केंद्राची आवश्यकता असल्याने वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने गल्ले बोरगाव येथे आले संशोधन केंद्र स्थापन करण्यास मान्यता मिळविण्यासाठी प्रस्ताव सादर केला.

त्याला कृषी परिषदेने २२ सप्टेंबर २०२२ रोजी मान्य करून तो शासनाकडे सादर केला. यासंदर्भात शासनाने कोणती कार्यवाही केली?, नसल्यास विलंबाची कारणे काय आहेत? असे प्रश्न आ. चव्हाण यांनी तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केले होते.

तसेच आ. चव्हाण यांनी सप्टेंबर २०२२ मध्ये कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांची भेट घेऊन गल्ले बोरगाव येथे अद्रक संशोधन केंद्र स्थापन करण्याची मागणी केली होती.

शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसंदर्भात सोमवारी विधान परिषदेत विरोधी पक्षाच्यावतीने २६० अन्वये दाखल केलेल्या प्रस्तावावर चर्चा करण्यात आली.

यावेळी गल्ले बोरगाव येथील आले संशोधन केंद्र स्थापन करण्यासंदर्भात अर्थसंकल्पात निधीची काहीच घोषणा करण्यात आली नसल्याचे आ. चव्हाण यांनी कृषिमंत्री यांच्या निदर्शनास आणून दिले.

यासाठी आवश्‍यक तो निधी देणार ः सत्तार

यावेळी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सदरील आले संशोधन केंद्र सुरू व्हावे यासाठी तीन महिन्यात याची प्रक्रिया पूर्ण करून यासाठी आवश्यक तो निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी घोषणा सभागृहात केली.

या घोषणेने मराठवाड्यातील आणि व मका पीक संशोधन केंद्राचा मार्ग एकदाचा मार्गी लागेल अशी आशा निर्माण झाली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tur Farming : तूर पिकाकडे वाढतो शेतकऱ्यांचा कल

Amarvel Control : सामूहिक प्रयत्नांमधूनच अमरवेल नियंत्रण शक्य

Food Distribution System : अन्नधान्य वितरणासाठी राज्य, केंद्र शासनाच्या योजना

Aquatic Ecosystem : कांदळवने : एक महत्त्वाची जलीय परिसंस्था

Healthy Ambadi : आरोग्यदायी पौष्टिक अंबाडी

SCROLL FOR NEXT