Abdul Sattar : ''गरीब खात होते तेच गहू तांदूळ श्रीमंत खातायत'' - कृषीमंत्री अब्दुल सत्तार

बीडमधील आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार दिवस कार्यक्रमात बोलताना सत्तार यांनी हे विधान केले आहे.
Abdul Sattar
Abdul SattarAgrowon

नेहमीच आपल्या विधानांमुळे चर्चेत राहणाऱ्या राज्याच्या कृषीमंत्र्यांनी (Maharashtra Agriculture Minister) पुन्हा एक विधान केले आहे. ''आधी गरीब जे खात होते तेच गहू-तांदूळ श्रींमत खातायत'' अशा आशयाचे विधान अब्दुल सत्तार (Abdul Sattar) यांनी केले आहे. त्यामुळे सत्तार यांचे वक्तव्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.

बीडमधील आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार दिवस कार्यक्रमात बोलताना सत्तार यांनी हे विधान केले आहे. यावेळी बोलताना सत्तार म्हणाले की, आज आपण आंतरराष्ट्रीय पौष्टिक आहार दिवस साजरा करत आहोत.

पण एक वेळ अशी होती की, हे जेवण गरिबांसाठी होतं. ज्वारी, बाजरी असेल हे पीक पहिले गरीब खायचे. पण आता जमाना बदलला. जे गरीब खात होते ते आता श्रीमंत खातात, असे सत्तार यांनी म्हटले आहे.

Abdul Sattar
Abdul Sattar: अखेर कृषिमंत्र्यांनी केला नुकसानग्रस्त भागांचा पाहणी दौरा; तातडीने पंचनाम्याचे आदेश 

दरम्यान, राज्याच्या कृषिमंत्रीपदावर असणारे सत्तार हे कायमच आपल्या विधानांमुळे चर्चेत असतात. कृषीमंत्री असलेल्या सत्तार यांच्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सात दिवसांत सहा शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. मात्र, या शेतकरी आत्महत्यांसदर्भात बोलताना सत्तार यांनी असंवेदनशील वक्तव्य केले.

Abdul Sattar
Abdul Sattar : कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा ; अमोल मिटकरी यांची मागणी

''शेतकरी आत्महत्या हा आजचा विषय नाही. अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या करतात'' असं बेजबाबदार वक्तव्य राज्याच्या कृषीमंत्रिपदी असलेल्या सत्तार यांनी केले होते.

सत्तार यांच्या शेतकरी आत्महत्यासंदर्भातील वक्तव्यावर अजित पवार यांनी टीका करत धारेवर धरले होते. सत्तार यांनी स्वत:च्या सिल्लोड मतदारसंघात शेतकरी आत्महत्यांविषयी असे विधान करायला नको होते, असे पवार म्हणाले होते.

अवकाळीमुळे शेतकऱ्यांचे फारसे नुकसान झालेले नाही, असे तारेही त्यांनी तोडले. इकडे राज्याचे मुख्यमंत्री कोणाचाही फोन उचलतात, असे व्हिडीओ फिरतात. मात्र, त्यांचे वाचाळ मंत्री आधार देण्याऐवजी शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात. असा घणाघातही पवार यांनी सत्तार यांच्यावर केला होता.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com