Crop Insurance Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance : तीन लाख शेतकऱ्यांनी रब्बीत भरला पीकविमा

Rabi Season : पंतप्रधान पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये एक रुपयामध्ये पिक विमा योजना राबविण्यात आली.

Team Agrowon

Nanded News : पंतप्रधान पिक विमा योजना रब्बी हंगाम २०२३-२४ मध्ये एक रुपयामध्ये पिक विमा योजना राबविण्यात आली. जिल्ह्यातील दोन लाख ९८ हजार २१२ अर्जदार शेतकऱ्यांनी रब्बी ज्वारी, बागायती गहू व हरभऱ्यांसाठी पीक विमा भरला आहे.

यात तीन लाख ७१ हजार ९९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केले आहे. विमा कंपनीकडे शेतकरी, केंद्र व राज्य सरकार असा एकूण १८४ कोटी ८५ लाखांचा विमा हप्ता जमा झाल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

राज्य शासनाने खरिपानुसारच रब्बीमध्येही एक रुपयात पीकविमा भरण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली होती. यामुळे यंदा या योजनेत शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. या योजनेत बागायती गहू पिकासाठी हेक्टरी ४२ हजार ५००, हरभरा पिकासाठी ३७ हजार ५०० तर ज्वारी (जिरायती) पिकासाठी ३३ हजार ७५० विमा संरक्षित रक्कम रुपये निश्‍चित केली आहे.

विमा भरण्याच्या कालावधीत जिल्ह्यातील दोन लाख ९८ हजार २१२ अर्जदार शेतकऱ्यांनी एक रुपये विमा हप्त्यानुसार पाच लाख चार हजार आठ रुपये विमा हप्ता भरला आहे. तर यात तीन लाख ७१ हजार ९९५ हेक्टर क्षेत्र विमा संरक्षीत केले आहे.

शेतकऱ्यांनी भरलेल्या विमा योजनेत राज्य सरकारचा हिस्सा १०२ कोटी ८९ लाख रुपये तर केंद्र सरकारचा हिस्सा ८१ कोटी ९१ लाख रुपये असा एकूण १८४ कोटी ८५ लाखांचा विमा कंपनीकडे जमा होणार आहे. सध्या जिल्ह्यातील हवामान रब्बीतील पिकांसाठी फारसे पोषक नाही.

कधी ढगाळ वातावरण, कधी धुक्याचे चादर तर कधी कडाक्याची थंडी अशी परिस्थिती आहे. यामुळे हरभरा पिकांवर मर रोगासह अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यंदा अवकाळी पाऊस मात्र या हंगामात झाला नाही.

याबाबीचा योजनेत समावेश

पंतप्रधान पिक विमा योजना कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक होती. पीक पेरणीतून काढणीपर्यंतचा कालावधी नैसर्गिक आग, वीज, कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, दुष्काळ, पावसातील खंड आदी बाबीमुळे पिकांच्या उत्पादनात येणारी घट काढणीपश्चात नुकसान जोखीम यामध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. नांदेड जिल्ह्यातील गहु बा, ज्वारी (जि), हरभरा या पिकांसाठी ही योजना लागू आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT