Namo Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Namo Shetkari Sanman : साताऱ्यात तीन लाख ८९ हजार शेतकरी ‘नमो’ योजनेत पात्र

First Installment of Namo Shetkari Sanman Scheme : राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेत जिल्ह्यातील अल्पभूधारक तीन लाख ८९ शेतकरी पात्र ठरले आहेत.

Team Agrowon

Satara News : राज्य सरकारने सुरू केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेत जिल्ह्यातील अल्पभूधारक तीन लाख ८९ शेतकरी पात्र ठरले आहेत. या शेतकऱ्यांचा दिवाळीपूर्वी पहिला हप्ता दोन हजार रुपयांप्रमाणे जमा केला जाणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेच्या धर्तीवर राज्य सरकारनेही अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी नमो शेतकरी सन्मान योजना जाहीर केली आहे. या योजनेतून लाभार्थी शेतकऱ्यांना वर्षाला सहा हजार रुपये मिळणार आहेत.

केंद्राच्या योजनेचे व राज्यातील योजनेचे मिळून शेतकऱ्यांना १२ हजार रुपये मिळणार आहेत. राज्यात सध्या दुष्काळ परिस्थिती असून, या परिस्थितीला तोंड देण्यासाठी, तसेच शेतकऱ्यांना सणासुदीत आर्थिक मदत देण्यासाठी नमो शेतकरी सन्मान योजनेचा पहिला हफ्ता राज्यातील ८५ लाख ६० हजार शेतकऱ्यांना प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे दिला जाणार आहे.

तो २६ ऑक्टोबरला जमा केल्याचे सांगितले जात आहे; पण ज्या शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण नाही, अशा शेतकऱ्यांना हा पहिला हप्ता मिळालेला नाही. त्यांनी ऑनलाइन तक्रार करायची आहे. त्यामुळे पुढील कार्यवाही तातडीने होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Wheat Price: गव्हाचे भाव पाडण्यासाठी केंद्राची चाल; गव्हाच्या साठा मर्यादेत केली कपात

Crop Insurance: फळ पीकविमाधारक केळी उत्पादकांत संभ्रम

Zilla Parishad Elections: आरक्षण अधिसूचनेवर माजी सदस्याचा आक्षेप

Pesticide License Suspended : केंद्रीय कृषिमंत्र्यांच्या आदेशानंतर एका कीटकनाशक कंपनीवर कारवाई; एचटी पिकांच्या वापरावर प्रश्नचिन्ह?

Nature Preservation: निसर्ग संवर्धनासाठी देशी वृक्ष संवर्धन

SCROLL FOR NEXT