Onion Agitation Agrowon
ॲग्रो विशेष

Onion Agitation : ‘लाल वादळा’चा सरकारला तीन दिवसांचा अल्टिमेटम

A three-day ultimatum : तिसऱ्या दिवशी आंदोलकांचा ठिय्या कायम असून या ‘लाल वादळा’ने सरकारला आता तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे.

Team Agrowon

Nashik News : कांदा दर प्रश्न, वन जमीन अशा १६ मागण्यांसाठी सोमवारी (ता. २६) मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी व अखिल भारतीय किसान सभेचे आंदोलक पायी चालत येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकले.

तिसऱ्या दिवशी आंदोलकांचा ठिय्या कायम असून या ‘लाल वादळा’ने सरकारला आता तीन दिवसांचा अल्टिमेटम दिला आहे. येत्या २ मार्चपर्यंत सरकारने आंदोलकांच्या मागण्यांबाबत निर्णय न घेतल्यास पुन्हा ‘मुंबईला लाँग मार्च’ काढण्याचा इशारा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार जे. पी. गावित यांनी दिला.

शेतकरी व कष्टकरी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी ‘माकप’ व किसान सभेने सोमवार (ता. २६)पासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. याविषयी तोडगा काढण्यासाठी महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, वनमंत्री सुधीर मुनगंट्टीवार, आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, पालकमंत्री दादा भुसे यांची बैठक झाली.

शिष्टमंडळात माजी आमदार जे. पी. गावित, डॉ. डी. एल. कराड व त्यांचे सहकारी हजर होते. पण मंत्र्यांनी फक्त आश्वासनेच दिली. प्रत्यक्ष कार्यवाही नसल्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महामुक्काम आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. जे. पी. गावित यांनी बुधवारी (ता. २८) पाण्याच्या टँकरवर चढून संवाद साधला.

या प्रसंगी डॉ. डी. एल. कराड यांनीही सरकारच्या भांडवलशाही धोरणावर टीका केली. तसेच वेळ पडली तर मुंबईपर्यंत धडक मारण्याची तयारी त्यांनी दर्शवली.

आंदोलकांनी सूचवले तीन पर्याय

शनिवार (ता. २)पर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन कायम.

त्यानंतर जेलभरो आंदोलन किंवा बेमुदत उपोषणाची घोषणा.

अन्यथा पुन्हा मुंबईला लाँग मार्च.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: गहू दरात सुधारणा, उडीद दर टिकून, बटाटा बाजारात चढ-उतार, पेरू दरात तेजी, चिकू दरात चढ-उतार

Shri Mangal Wheat: ‘श्री मंगल’ गव्हाचा नवा वाण ; हेक्टरी ५२ क्विंटल उत्पादनाची क्षमता

Crop Damage Survey: अहिल्यानगरला साडेसात लाख हेक्टर क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण

Shivraj Singh Chouhan: काँग्रेसच्या सलग पराभवाला कारण कोण? शिवराज सिंह चौहान यांचा राहुल गांधींवर निशाणा

Monsoon Return: देशाच्या उर्वरित भागांतून मॉन्सूनच्या परतीसाठी पोषक स्थिती; राज्यात उन्हाचा चटका कायम

SCROLL FOR NEXT