अजिंक्य कुलकर्णी
दैनंदिन जीवनात (life) जसजसे आपण पुढे जात असतो तसतसे आपल्या सभोवतालच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, वैचारिक, गोष्टींचा आपल्या जडणघडणीवर मोठा प्रभाव पडत असतो. आपण जे वाचतो, पाहतो त्यावरून आपण आपली विचार सरणी, आपली मते ठरवत असतो. पण आपण आपली जी मतं ठरवली आहे त्याची कधी उलट तपासणी केली आहे का? आपण आपल्या मतांचं कधी ऑडिट केलं आहे का? कदाचित आपण चुकीच्या गृहीतकांवरही आपली मतं तयार केलेली असू शकतात. हवामान शास्त्रज्ञ तसेच जॉर्जिया विद्यापीठातील भूगोलाचे प्राध्यापक (Geography) मार्शल शेफर्ड (Marshall Shepherd) यांचे ‘तुमच्या भूमिकांना आकार देणारे तीन पूर्वग्रह’ नावाचे एक व्याख्यान याबाबतीत फारच उद्बोधक आहे.
त्यात त्यांनी आपल्या धरणांचे (Dam) उत्तम प्रकारे विश्लेषण केले आहे. त्यांच्या मते, ‘आपण जेव्हा वाचत असतो, ऐकत असतो तेव्हा आपले मन अजिबात खुलं नसतं. नवीन काही स्वीकारण्याची आपली चटकन तयारी नसते. आपली मतं आधीच ठरलेली असतात. तीन तऱ्हांच्या पूर्वग्रहामुळे आपण आपला वैश्विक दृष्टिकोन दृढ करत जातो. एखादा विचार ऐकताना आपण केवळ आपल्या मताच्या समर्थनासाठी त्याचा शोध घेत असतो. दुसऱ्या प्रकारात आपल्या जाणिवेपेक्षा वेगळा विचार असल्यास तो लगेचच नाकारला जातो. तर कधी कधी फारशी माहिती नसतानाही आपल्याला अधिक माहिती असल्याचा ग्रह तयार करून घेतो. यामधूनच आपला अहंगंड पोसला जातो व आपले पूर्वग्रह तयार होतात.
व्यक्तीच्या पूर्वग्रह व समज यातूनच त्याची विज्ञान विषयक मतं तयार होत असतात. म्हणजे पहा एकीकडे पर्यावरण तज्ज्ञ, वैज्ञानिक पोटतिडकीने सांगत आहेत की हवामान (Weather) बदल होतो आहे, ऋतू बदल होत आहेत, तरी काही धूर्त राजकारणी त्यांच्या स्वतःच्या मताचे समर्थन करण्यासाठी म्हणत आहेत की हवामान (Weather) बदल वगैरे गोष्टी या फक्त एक टूम आहे म्हणून! आपल्याला बऱ्याच वेळा विज्ञान जे सत्य सांगू पहात आहे ते मान्य करावेच लागेल. भले मग ते सत्य आपल्या मानलेल्या मताच्या विरुद्ध का असेना. कारण यातच सर्वांचे सौख्य सामावलेले असते. कधीकधी आपल्या आणि इतरांच्या भल्यासाठी का होईना आपले पूर्वग्रह सोडण्याची तयारी आपण दाखवली पाहिजे. आपले मन, बुद्धी (Brain) हे जितकं खुलं असेल तितकं ते जास्त स्वच्छ राहील. मन कसं खुलं असलं पाहिजे? तर नदीसारखं. मन जितकं नदीसारखं वाहतं असेल तितकं ते निर्मळ होत राहील. जेव्हढं ते एका जागी साचलेलं असेल तेवढी त्याला दुर्गंधीच येईल. काय निवडायचं हे आपलं आपण ठरवायचं! काऽऽऽय?
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.