कापूस उत्पादन घटीच्या अंदजाने दराला आधार

देशातील कापूस उत्पादन यंदा ३३५ लाख गाठींवर स्थिरावेल, असा अंदाज काॅटन असोसिएशन ऑफ इंडियाने व्यक्त केला. तर वापर मात्र ३४० लाख गाठींवर होईल, असे म्हटले.
Cotton production
Cotton productionagrowon
Published on
Updated on

1. पावसाला पोषक हवामानामुळे राज्यात ढगाळ हवामान होत आहे. मात्र उन्हाचा ताप आणि उकाडा कायम आहे. उद्या राज्यात उन्हाचा चटका कायम राहणार असून, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. तसेच पश्चिम विदर्भापासून मराठवाडा, उत्तर कर्नाटक, दक्षिण कर्नाटक पर्यंत वाऱ्याचे प्रवाह खंडीत झाल्याने हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता आहे.

2. खुल्या बाजारात हरभऱ्याला हमीभावापेक्षा(MSP) कमी दर आहेत. त्यामुळे यंदा नाफेडच्या खेरदीला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. नाफेडने देशात आत्तापर्यंत ५ लाख ५७ हजार टन हरभरा खेरदी केला. नाफेडच्या खेरदीत अद्यापही गुजरात आघाडीवर आहे. गुजरातमध्ये आत्तापर्यंत २ लाख ६० टन हरभरा खरेदी झाली. तर महाराष्ट्रात सव्वादोन लाख टन हरभरा शेतकऱ्यांनी नाफेडला विकला. त्यानंतर कर्नाटकात ५२ हजार तर आंध्र प्रदेशात २० हजार टनांची खरेदी झाली.

Cotton production
लिंबू 'भाव' खातोय; पण शेतकऱ्यांचा खिसा रिकामाच

3. यंदा केळीच्या मृग बहर लागवडीसाठी आगाऊ रोप मागणीला शेतकऱ्यांचा थंडा प्रतिसाद मिळतोय. मृग बहराच्या लागवडी जून आणि जुलै महिन्यात होतात. मात्र राज्यभरातील सुमारे 35 टिशू कल्चर लॅबमधून(Tissue Culture Lab) केवळ २० टक्के रोपांची मागणी नोंदवण्यात आली आहे. यामुळे राज्यातील लॅबमध्ये सुमारे ६ ते ७ कोटी रोपे पडून आहेत. यामुळे लॅब चालक हतबल झाले. आता शिल्लक राहिलेल्या रोपांचे काय करायचे? असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. खानदेशात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये होणाऱ्या लागवडी ही फार झाल्या नाहीत. तर पश्चिम महाराष्ट्रात तर केळी लागवडीला अतिशय कमी प्रतिसाद आहे.

4. राज्यातील जवळपास ६७ लाख शेतकऱ्यांना २०२१-२२ मधील रब्बी व खरीप हंगामात २० हजार ५८४ कोटींचे पीककर्ज वाटप करावे, असे उद्दिष्ट राज्यस्तरीय बॅंकर्स समितीने दिले होते. परंतु ३१ मार्च २०२२ पर्यंत राज्यातील ३१ जिल्हा बॅंकांपैकी दहा बॅंकांनी ८० टक्क्यांपेक्षा कमी कर्जवाटप केल्याची माहिती राज्य बॅंकेकडून देण्यात आली. त्यामुळे राज्यातील जवळपास सात लाख शेतकऱ्यांना विशेषत: कर्जमाफीचा लाभ घेतलेल्यांना बॅंकांकडून पीककर्ज मिळू शकले नाही.

5. देशात यंदा कापूस उत्पादनात( Cotton production)मोठी घट आली. त्यामुळे उद्योगांना कापसाचा तुटवडा जाणवत आहे. काॅटन असोसिएशन ऑफ इंडिया अर्थात सीएआयनेही आपल्या अंदाजात सतत बदल केले आहेत. सीएआयने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या अंदाजात देशात यंदा ३३५ लाख १३ हजार गाठी उत्पादन होईल असे म्हटले. एक कापूस गाठ १७० किलोची असते. यापुर्वी सीएआयने ३४३ लाख १३ हजार गाठी उत्पादानाचा अंदाज व्यक्त केला होता. दोन्ही अंदाजांमध्ये ८ लाख गाठींची तफावत आहे. देशातील बाजारांत ३१ मार्चपर्यंत २६३ लाख गाठी आवक झाली. मागील पाच वर्षांतील सरासरीच्या तुलनेत यंदाची आवक १० लाख गाठींनी अधिक आहे. तर दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच एप्रिल ते सप्टेंबर २०२२ या काळात बाजारांत ७२ लाख गाठी कापूस आवकेचा अंदाज आहे. सीएआयने कापूस उत्पादनात घटीचा अंदाज व्यक्त केला, मात्र निर्यातीचा अंदाज ४५ लाख गाठींवर कायम ठेवला. देशातील वापरही ३४० लाख गाठींवर राहिल, असे म्हटले. म्हणजेच सीएआयच्या नव्या अंदाजानुसार देशातील उत्पादन ३३५ लाख गाठी आणि वापर ३४० लाख गाठी, असे समीकरण आहे. याचाच अर्थ असा की यंदा उत्पादनापेक्षा वापर अधिक आहे. त्यामुळे देशात कापसाच्या दरात तेजी आहे. सीएआयने १५ लाख गाठी कापूस आयातीची शक्यता वर्तविली. मात्र जागतीक बाजारातही दर तेजीत आहेत. त्यामुळे नेमकी आयात किती होते ते पाहावे लागेल. मात्र सीएआयाच्या उत्पादन घटीच्या अंदजाने देशातील कापूस बाजाराला आधार मिळण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com