Tur Theft Agrowon
ॲग्रो विशेष

Tur Theft : ‘वखार’च्या केंद्रातून साडेतीन लाखांची तूर चोरीला

Wakhar Center : मोर्शी तालुक्यातील अमरावती मार्गावरील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या केंद्रातून शेतकऱ्याने साठवून ठेवलेल्या मालापैकी ३ लाख ६५ हजार ७५० रुपयांच्या तुरीचे ७७ कट्टे चोरीस गेले.

Team Agrowon

Amravati News : मोर्शी तालुक्यातील अमरावती मार्गावरील महाराष्ट्र राज्य वखार महामंडळाच्या केंद्रातून शेतकऱ्याने साठवून ठेवलेल्या मालापैकी ३ लाख ६५ हजार ७५० रुपयांच्या तुरीचे ७७ कट्टे चोरीस गेले.

साठा अधीक्षक स्वप्निल काशिनाथ डोंगरे (वय ३२) यांच्या तक्रारीवरून मोर्शी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. वखार महामंडळातील एका कर्मचाऱ्याने येथील गोदाम क्रमांक चारच्या शटरचे कुलूप तुटले असल्याची माहिती अधीक्षक यांना दिली.

गोदामातील पोत्यातून तूर अस्ताव्यस्त पडलेली दिसली. मोर्शी येथील तळणीच्या गोदामाची पाहणी केली असता लॉट क्रमांक नऊमधील तुरीचे पोते अस्ताव्यस्त दिसून आले.

अधीक्षक यांनी रेकॉर्डची तपासणी केली असता, शेतकरी राहुल विश्वासराव निमकर (रा. अंबाडा) यांच्या २२३ कट्ट्यांपैकी ७७ कट्टे तूर, प्रत्येक कट्टा ५० किलो वजनाचे कमी दिसून आले. चोरीस गेलेल्या तुरीच्या मालाची किंमत ३ लाख ६५ हजार ७५० रुपयांची असल्याचे स्वप्निल डोंगरे यांनी मोर्शी ठाण्यात नोंदविलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT