Tur Cultivation : बेडवर लागवडीमुळे पावसातही तूर बचावली

Crop Management : शिवारात पाण्याच्या निचऱ्याची कोणतीच सोय नसल्याने पिके पिवळी पडून मर रोगाचाही प्रादुर्भाव होत होता. त्यातूनही पीक वाचले तर फुलोऱ्याच्या वेळी तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होत होता.
Tur Farming
Tur FarmingAgrowon
Published on
Updated on

Amravati News : संततधार पावसामुळे पिके पाण्यात बुडाली. त्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव झाला. त्याचा उत्पादकतेवर परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र अमरावती जिल्ह्यातील चांदूररेल्वे तालुका याला अपवाद ठरला आहे. या भागात कृषी सहायक अमोल चौकडे यांच्या पुढाकाराने ३,५४७ हेक्‍टरवर तुरीची बेडवर लागवड करण्यात आली. परिणामी अतिरिक्‍त पाणी सरीबाहेर गेल्याने पिके वाचविण्यात यश आले आहे.

जून महिन्यात खंड देणाऱ्या पावसाची जुलै आणि ऑगस्ट महिन्यात संततधार अनुभवण्यात आली. महिनाभराची सरासरी एक ते दोन दिवसाच्या पावसानेच गाठली. त्यामुळे अनेक शिवारात पाणी साचून राहिले. या शिवारात पाण्याच्या निचऱ्याची कोणतीच सोय नसल्याने पिके पिवळी पडून मर रोगाचाही प्रादुर्भाव होत होता. त्यातूनही पीक वाचले तर फुलोऱ्याच्या वेळी तूर पिकावर आकस्मिक मर रोगाचा प्रादुर्भाव होत होता.

Tur Farming
Tur Farming : तूर पिकात आंतरमशागतीवर द्या भर

तूर पिकाच्या मुळांना जादा पाणी सहन होत नाही. मुळावर फ्युजारियम उडम नावाची बुरशी वाढण्यास सुरुवात होते. याचा प्रादुर्भाव झाल्यास पीक हातचे गमावण्याची वेळ शेतकऱ्यांवर येते. यामुळे दरवर्षी ७० ते ८० टक्‍के शेतकऱ्यांचे नुकसान होत होते. कृषी सहायक अमोल चौकडे यांनी त्या पार्श्‍वभूमीवर बेडवरील तूर लागवड तंत्रज्ञानाच्या प्रसारावर भर दिला. त्यांच्या जाणीव जागृतीमुळे चांदूररेल्वे तालुक्‍यात एकूण ५,९१३ हेक्‍टरवरील एकूण तूर क्षेत्रापैकी सुमारे ३,५४७ हेक्‍टरवरील तूर ही बेडवर लावण्यात आली आहे.

राज्याच्या इतर भागात कपाशी, सोयाबीन, तूर या पिकांना संततधार पावसाचा फटका बसला. मात्र चांदूररेल्वे तालुक्‍यातील ३,५४७ हेक्‍टरवर बेडवर लावण्यात आलेली तूर मात्र जोमदार बहरली आहे. पावसाचे अतिरिक्‍त पाणी सरीतून बाहेर पडले, सरीतही पाणी साचल्याने त्या ओलाव्याचा पिकाला गरजेच्या वेळी उपयोग होणार आहे.

Tur Farming
Tur Bajarbhav : आमच्या तुरीला किमान २० टक्के जास्त हमीभाव द्या; कलबुर्गीच्या शेतकऱ्यांची मागणी

सहा वर्षांपासून जागृतीवर भर

सोयाबीनमध्ये सहा ते सात तासानंतर अंतर सोडले जाते. या दांडामुळे पावसाच्या पाण्याचा वेग कमी होत असल्याने मातीची धूप कमी होते. सोयाबीन पिकात यामुळे हवा खेळती राहत असल्याने उत्पादकता वाढ होते. याला शेतकऱ्यांचा प्रतिसाद मिळत बोरी या एकाच गावात २५० हेक्‍टरवर पट्टा पद्धतीने सोयाबीन लागवड करण्यात आली. त्यानंतर गेल्या सहा वर्षांत पट्टा पद्धतीने लागवड क्षेत्र अडीच हजार हेक्‍टरवर पोहोचले आहे.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राहूल सातपुते, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र बांबल यांच्या मार्गदर्शनात चांदूररेल्वे तालुक्‍यातील गावांमध्ये बेडवरील पीक लागवड तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यावर भर दिला. त्या गावातील कृषी साहायकांचे देखील या कार्यात सहकार्य मिळाले. त्यामुळेच बेडवरील तूर लागवड क्षेत्र ३,५४७ हेक्‍टरवर पोचले आहे.
अमोल चौकडे, कृषी सहायक, चांदूररेल्वे, अमरावती

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com