Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नुकसानीच्या साडेतीन लाख पूर्वसूचना

Heavy Rain Crop Loss : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तीन लाख ६१ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीचे अर्ज दाखल केले आहेत.

Team Agrowon

Yavatmal News : सप्टेंबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील तीन लाख ६१ हजार शेतकऱ्यांनी नुकसानीचे अर्ज दाखल केले आहेत. यातील एक लाख ४७ हजार शेतकऱ्यांचे सर्वेक्षण पूर्ण झाले असून अजूनही दोन लाख शेतकऱ्यांचे सर्वेक्षण प्रलंबित आहे.

यंदा पावसाने शेतकऱ्यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीनंतर पीकविमा मिळावा, यासाठी शेतकऱ्यांनी पूर्वसूचना दाखल करण्यास सुरुवात केली आहे.

कृषी विभागाकडे नुकसानीच्या तीन लाख ६१ हजार २७० तक्रारी दाखल झाल्या आहेत. पंचनामे करण्यास सुरुवात झाली असली तरी गती अत्यंत कमी आहे. यामुळे अतिवृष्टी होऊन पंधरा दिवस झाल्यानंतरही पंचनामे पूर्ण झालेले नाहीत. आतापर्यंत एक लाख ४७ हजार ६६० तक्रारींचे पंचनामे झाले आहेत.

अजूनही दोन लाख तेरा हजार ६१० तक्रारींचे सर्वेक्षण होणे बाकी आहे. पंचनाम्याची गती पाहता आणखी बराच कालावधी अंतिम अहवाल सादर होण्यास लागणार आहे. अतिवृष्टीने सर्वाधिक नुकसान महागाव तालुक्यात झाले आहे.

या ठिकाणी ३४ हजार ८६६ पूर्वसूचना दाखल झाल्या आहेत. पंचनामे झाले नसल्याने शेतकऱ्यांना मदत मिळण्यास विलंब होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. आधीच शेतकरी अतिवृष्टीने अडचणीत आला आहे. यास्थितीत शेतकऱ्यांना मदतीची गरज असून तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

तालुका दाखल पूर्वसूचना

आर्णी २२७०९

बाभूळगाव १८७१५

दारव्हा ३३१९३

दिग्रस १५७९६

घाटंजी ३०७५७

कळंब २४९६५

केळापूर १४५८६

महागाव ३४८६६

मारेगाव १९११९

नेर २२२९१

पुसद २५७०४

राळेगाव २६३२३

उमरखेड १९०४४

वणी २७०५१

यवतमाळ १६७०१

झरीजामणी ९४५०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT