Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : नांदेडला साडेतीन लाख हेक्टर क्षेत्र बाधित

Rain Update : नांदेडमध्ये एक व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे.

Team Agrowon

Nanded News : नांदेडमध्ये एक व दोन सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसामुळे साडेतीन लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले आहे. हा फटका जिल्ह्यातील १६ तालुक्यातील एक हजार २२३ गावांतील चार लाख ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना बसला आहे.

यात सर्वाधिक जिरायती पिकांना बाधा झाली आहे. तर बागायती पिकांसह जमिनी खरडूनही नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल जिल्हा प्रशासनाने शासनाला कळविला आहे. नांदेड जिल्ह्यात यंदा जून तसेच जुलैमध्ये समाधानकारक पाऊस झाल्यामुळे पाऊस झाला. हा पाऊस सर्वच तालुक्यात झाला.

यामुळे नांदेड जिल्ह्यात खरिपामध्ये सात लाख ६५ हजार हेक्टरवर पेरणी झाली. पिकांची वाढही चांगली असताना सप्टेंबर महिना सुरू होताच पावसाने कहर सुरू केला. ता. एक व दोन सप्टेंबर रोजी जिल्ह्यात मुसळधार पाऊस होऊन एक तारखेला २६ मंडलांत तर दोन तारखेला तब्बल ४५ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

या पावसामुळे नांदेड, कंधार, लोहा, किनवट, माहूर, मुखेड, धर्माबाद, हदगाव, हिमायतनगर, मुदखेड, नायगाव, उमरी या तालुक्यांना नुकसानीचा जबर फटका बसला. या तालुक्यातील अनेक मंडलांत एकापेक्षा अनेक वेळा अतिवृष्टीची नोंद झाली. या मुसळधार पावसाचा फटका जिल्ह्यातील एक हजार २२३ गावांतील चार लाख ५७ हजार ७५७ शेतकऱ्यांना बसला.

यात जिरायती क्षेत्राचे तीन लाख लाख ३९ हजार १४७ हेक्टरवरील पिकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. तर १९०२ हेक्टर बागायती, ३१० हेक्टर फळपिकांचे नुकसान झाले आहे. तर १९२ हेक्टर जमीन खरडून गेली आहे.

या अतिवृष्टीत एकूण तीन लाख ४१ हजार ५५१ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. शासनाच्या आदेशानुसार शासकीय यंत्रणांकडून शेतीपिकांच्या नुकसानीबाबत प्राथमिक माहिती घेऊन शासनाला कळविण्यात आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT