Crop Damage : बीडमध्ये उडीद, तूर, सोयाबीन, कापूस, कांद्याचे अतिवृष्टीने नुकसान

Heavy Rain : प्रामुख्याने उडीद, बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर व कांदा या पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Beed News : जिल्ह्यातील प्राथमिक माहितीनुसार शिरूर कासार, वडवणी व केज वगळता परळी, अंबाजोगाई, धारूर, गेवराई, माजलगाव, पाटोदा, आष्टी व बीड या तालुक्यांतील ६११ गावांतील २ लाख ३ हजार ४९५ हेक्टरवरील शेती पिकाचे नुकसान झाले आहे. प्रामुख्याने उडीद, बाजरी, सोयाबीन, कापूस, तूर व कांदा या पिकाचे अतिवृष्टीमुळे मोठे नुकसान झाले आहे.

बीड जिल्ह्यात नुकसान झालेल्या क्षेत्रात १ लाख १९ हजार १८२ शेतकऱ्यांच्या १ लाख ३ हजार ७४१ हेक्टरवरील शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा कमी तर ६६ हजार ५४२ शेतकऱ्यांचे ९९ हजार ७५४ हेक्टरवरील शेती पिकाचे ३३ टक्क्यांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. पंचनामे अंतिम नुकसानीचे क्षेत्र स्पष्ट होणार आहे.

Crop Damage
Crop Damage Survey : मिरज, पलूस, शिराळ्यातील पिकांचे पंचनामे कधी?

शेतीपिकांच्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा ः कृषिमंत्री मुंडे

राज्याचे कृषिमंत्री तथा बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी सोमवारी (ता. ३) परळी व अंबाजोगाई तालुक्यांत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या गावांमध्ये भेटी देऊन नुकसानग्रस्त शेती पिकांची पाहणी केली. प्रशासनास तातडीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून शासनाकडे मदतीसाठी अहवाल पाठवण्याचे निर्देश या वेळी श्री मुंडे यांनी दिले.

Crop Damage
Crop Damage Survey : अतिवृष्टीचे तातडीने पंचनामे करा

कौडगाव हुडा, कौडगाव घोडा आदी गावांमध्ये भेटी दिल्यानंतर धनंजय मुंडे यांनी स्थानिक शेतकऱ्यांशी संवाद साधला. दरम्यान, बीड जिल्ह्यात मागील दोन-तीन दिवसांत सातत्याने झालेल्या पावसामुळे शेतांमध्ये पाणी साचले असून अनेक नद्यांना पूर आले आहेत. गावांमध्ये पाणी शिरून घरातील वस्तूंची नासधूस-घरांची पडझड आदी नुकसानीचेही पंचनामे करण्याबाबत श्री. मुंडे यांनी प्रशासनास सूचित केले.

प्राथमिक अहवालानुसार तालुकानिहाय बाधित गावे, शेतकरी संख्या, नुकसान क्षेत्र (हेक्टरमध्ये)

तालुका गाव शेतकरी क्षेत्र

बीड ११५ १६६७६ १३३५२

आष्टी २३ ८४७५ ३६७०

पाटोदा १२ ५००० ४०००

माजलगाव १२१ ३०४४२ ४५७४३

गेवराई ११० ४००३० ४५२००

धारूर २४ १४० १०८

अंबाजोगाई १०४ ४८९१६ ३७४५०

परळी १०२ ३१५०० ४९१५२

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com