Sugarcane Harvesting  Agrowon
ॲग्रो विशेष

Leopard Terror : ऊस तोडणीमुळे बिबट्यांचा धोका वाढला

Leopard Attack News : जुन्नरसह आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये ऊस तोडणी हंगाम सुरू झाला असून, ऊसतोडीमुळे बिबट्यांचा धोका वाढला आहे.

गणेश कोरे

Pune News : जुन्नरसह आंबेगाव, खेड, शिरूर या तालुक्यांमध्ये ऊस तोडणी हंगाम सुरू झाला असून, ऊसतोडीमुळे बिबट्यांचा धोका वाढला आहे. यामुळे ऊस तोडणी करताना परिसराची पाहणी करून आणि बिबट्या उसात नसल्याची खात्री करूनच तोडणी सुरू करण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. ऊस तोडणी सुरू होताना, बिबट्यांचा हक्काचा निवारा कमी होणार असल्याने बिबटे सैरभैर होऊन हल्ले वाढण्याचे धोके निर्माण झाले आहेत.

जुन्नर आणि आंबेगावसह शिरूर तालुक्यातील भीमाशंकर, विघ्नहर, घोडगंगा आदी सहकारी आणि इतर खासगी साखर कारखान्यांसाठी जुन्नरचा शेतकऱ्यांचा ऊस जातो. जुन्नर तालुक्यात ९ हजार ८८६ हेक्टर क्षेत्रात उसाचे पीक घेतले जाते. साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झाल्याने अनेक ठिकाणी ऊस तोडीला सुरुवात झाली आहे.

जुन्नर तालुक्यातील ऊस शेती म्हणजे बिबट्यांचे सुरक्षित घर म्हणून ओळखले जाते. ऊसतोड सुरू झाल्यामुळे उसाची शेते मोकळी होऊ लागली आहेत. यामुळे बिबट्यांना लपण्याची जागा राहणार नाही. उसाच्या शेतात सुरक्षित असलेली लपण व निवारा कमी झाल्याने बिबटे सैरभैर होऊन मानवी वस्त्यांमध्ये येण्याचा धोका वाढला आहे. यातूनच बिबट्यांकडून मानवी हल्ल्यांचा देखील धोका निर्माण झाला आहे.

ऊसतोडीच्या काळात त्यांचे लपणे संपुष्टात आल्याने बिबट्यांचा मुक्तसंचार मोठ्या प्रमाणात वाढते. तसेच या काळात पशुधनावर हल्ले झाल्याच्या अनेक घटना यापूर्वी घडल्या आहेत. हा अनुभव लक्षात घेऊन वनविभागाने शेतकऱ्यांना व नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

यापूर्वी ऊसतोड सुरू असताना ऊसतोड कामगारांना अनेकवेळा बिबट्यांचे बछडे आणि बिबटे आढळून आले आहेत. या काळात या बछड्यांची आई अधिक आक्रमक झालेली असते. माणिकडोह येथील बिबट निवारा केंद्रातील रेस्क्यू टीमकडून यापूर्वी अनेकदा अनेक बछडे त्यांच्या आईच्या कुशीत नैसर्गिकरित्या सोपवले आहे.

ऊसतोड सुरू झाली आहे. ऊसतोडीमुळे बिबट्यांना त्यांना नेहमीची जागा राहणार नाही. नवीन सुरक्षित जागा शोधण्याच्या प्रयत्नात बिबटे सैरभैर होऊन मानवी वस्त्यांमध्ये येण्याची शक्यता असते. शेतकऱ्यांनी व नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगावी. ऊसतोडणी सुरू करताना परिसरात आवाज करून बिबट्या नसल्याची खात्री करूनच तोडणी सुरू करावी.
- प्रदीप चव्हाण, वनपरिक्षेत्र अधिकारी, जुन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast: हळदीचे दर स्थिर; मोहरीचे दर टिकून, उडदाचा बाजार दबावात, गव्हाचे दर स्थिरावले, जिऱ्याचे भाव टिकून

Onion Subsidy: कांदा अनुदान योजना; सातबारावर नोंद नसलेल्या शेतकऱ्यांना २८ कोटींचे अनुदान

Banana Farming: केळी बागेचे उत्पादन वाढवण्यासाठी योग्य खत व पाणी व्यवस्थापन

Farmers Protest : ‘काळा’ पोळा करून सरकारला इशारा

Jayakwadi Dam : जायकवाडीच्या आवकेत, विसर्गात वाढ

SCROLL FOR NEXT