Pune News : येथील इनामगाव रस्त्यावरील नागवडे वस्तीमध्ये मध्यरात्री १२.४५ च्या सुमारास गोठ्यातील वासरावर बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात बाळासाहेब जनार्धन नागवडे यांच्या गोठ्यातील वासराचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे.
बिबट्यांचा वावर वाढल्याने रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणे अवघड झाले आहे. रात्री अपरात्री शेतकऱ्यांना पिकांना पाणी देण्यासाठी शेतामध्ये जावे लागते.
यापूर्वीही मांडवगण फराटा तसेच परिसरातील गणेगाव, बाभूळसर बुद्रुक, तांदळी, इनामगाव, पिंपळसुटी, शिरसगाव काटा, वडगाव रासाई, सादलगाव आदी गावांमधील वाड्यावस्त्यांवर बिबट्याच्या हल्ल्यांचे प्रकार घडले आहेत.
यामध्ये शेळ्या, कुत्रे, वासरे, घोडे अशा पाळीव प्राण्यांचे बळी गेले आहेत. वनविभागाने पिंजरा लावून या बिबट्यांना पकडावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.