Kolhapur Flood  Agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Flood : हजारो हेक्टर शेती पाण्याखालीच

Crop Damage : राधानगरी धरणाचे गुरुवारी विसर्ग होणारे पाणी नदीत आल्याने पंचगंगेच्या पाण्‍यात सुरु झाली आहे.

Team Agrowon

Kolhapur / Satara / Sangli News : राधानगरी धरणाचे गुरुवारी विसर्ग होणारे पाणी नदीत आल्याने पंचगंगेच्या पाण्‍यात सुरु झाली आहे. कृष्णा नदीच्या पाण्यातही दोन ते तीन इंचांनी वाढ असल्याने पूर तातडीने ओसरण्याची शक्यता मावळली आहे. अजूनही हजारो हेक्टर शेती पाण्‍याखालीच आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी पाणी उतरलेले नाही.

कोल्हापूर जिल्ह्यात रात्रभर पाऊस व दिवसभर उघडीप अशी स्‍थिती आहे. राधानगरी धरणाचे तीन दरवाजे अद्यापही सुरू आहेत. गेल्‍या चार दिवसांपासून ओसरणाऱ्या पंचगंगा नदीच्या पाण्याला ब्रेक लागला. दुपारी दोन ओसरणाऱ्या पाण्यात पुन्हा दोन इंचांनी वाढ झाली. कोल्हापूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूकही अद्याप सुरू झालेली नाही.

आलमट्टी व कोयना धरणातील विसर्ग कायम असून, वारणा धरणातील विसर्ग वाढविला आहे. शुक्रवारी (ता. २) दुपारी चार वाजेपर्यंत पंचगंगा धोक्याच्या खाली ४२ फूट ४ इंचांवर वाहत आहे. आलमट्टी व कोयना धरणातील विसर्ग कायम आहे.

वारणा व पाटगाव धरणातील विसर्ग वाढविला आहे. जिल्ह्यात अद्याप अनेक ठिकाणी पावसाचे पाणी पसरले आहे. त्यामुळे एकूण ९३ मार्ग आणि ७३ बंधारे पाण्याखाली आहेत. पावसामुळे जिल्ह्यात घरे, जनावरांचे गोठे यांची पडझड होऊन ५७ लाख ३९ हजारांचे नुकसान झाले आहे. त्याचबरोबर पूरबाधित क्षेत्रातील नुकसानीचे पंचनामे सुरूच आहेत.

दरम्‍यान, अलमट्टी धरणातून पाण्याच्या विसर्गात घट केली आहे. शुक्रवारी सकाळी विसर्गात ५० हजार क्युसेकने घट केली असून सध्या धरणातून तीन लाख क्युसेकने विसर्ग सुरू आहे. अलमट्टी धरणात पाण्याची आवक कमी अधिक होत आहे. त्यामुळे धरणातून विसर्ग कमी-अधिक प्रमाणात करण्यात येत आहे. कोयना धरणातूनही विसर्ग वाढविण्‍यात आल्याने दिलासादायक परिस्थिती नसल्याची स्थिती आहे.

शिरोळ तालुक्याला पुराचा विळखा कायम

शुक्रवारी सकाळी आठ वाजता कोयना धरणात एकूण ८६.६३ टीएमसी म्हणजेच ८२.३१ टक्के पाणीसाठा झाला आहे. सकाळी नऊ वाजता सांडव्यावरून सोडलेल्या विसर्गात वाढ करून ५० हजार क्युसेक विसर्ग करण्‍यात आला आहे.

धरण पायथा विद्युत गृहामधील २१०० क्युसेक्स विसर्गासह कोयना नदीमधील एकूण विसर्ग ५२ हजार १०० क्युसेक आहे. कोयना-कृष्‍णा नद्यांच्‍या पाण्यात वाढ कायम असल्‍याने शिरोळ तालुक्याला असणारा पुराचा विळखा आणखी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Drought Relief Proposal: राज्याचा १५ हजार कोटींचा दुष्काळ मदत प्रस्ताव; कृषिमंत्री भरणेंची माहिती

Rain Forecast: चक्रीवादळाच्या प्रभावामुळे राज्यात पावसाची शक्यता

MAGNET Projects Delayed: चार वर्षांपासून ‘मॅग्नेट’चे प्रकल्प कागदावरच; पूर्व विदर्भात एकही प्रकल्प सुरू नाही

Finance Company Vandalism: फायनान्स कंपन्यांच्या कार्यालयांत तोडफोड; नांदेडमध्ये सक्तीच्या वसुलीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक

NDRF Assistance Norms: एनडीआरएफच्या मदतीच्या निकषांत केंद्र सरकारकडून वाढ; आपत्तीग्रस्तांना दिलासा

SCROLL FOR NEXT