Kharif Sowing Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Sowing : यंदाचे खरीप क्षेत्र राहणार साडेचार लाख हेक्टरवर

Kharif Season : हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज जाहीर झाला असतानाच आता कृषी विभागाकडून देखील खरीप नियोजनाला अंतिम स्वरूप दिले जात आहे.

Team Agrowon

Wardha News : हवामान खात्याकडून पावसाचा अंदाज जाहीर झाला असतानाच आता कृषी विभागाकडून देखील खरीप नियोजनाला अंतिम स्वरूप दिले जात आहे. त्यानुसार जिल्ह्यात यंदा ४ लाख ३४ हजार २४ हेक्‍टरवर खरीप पिकांची लागवड प्रस्तावित करण्यात आली आहे.

कृषी विभागाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा खरीप पिकांखालील क्षेत्र ४ लाख ३४ हजार २४ हेक्‍टर राहणार आहे. त्याकरिता ६८ हजार ७७ क्‍विंटल बियाण्यांची आवश्‍यकता असून १ लाख १० हजार ९१० टन खत लागेल. कृषी आयुक्‍तालयस्तरावर या संदर्भाने मागणी देखील नोंदविण्यात आली आहे.

सिंचनाच्या सोयी असलेले शेतकरी मॉन्सूनपूर्व पेरणीवर भर देतात त्या पार्श्‍वभूमीवर खताच्या उपलब्धतेवर कृषी विभागाला भर द्यावा लागणार आहे. दुसरीकडे जिल्ह्यात काही ठिकाणी दुष्काळीस्थिती असल्याने पाणीप्रश्‍न गंभीर झाला आहे.

काही गावांना टॅंकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शेती सिंचनाची अवस्था देखील अशीच काहीशी आहे. परिणामी पाण्याच्या उपलब्धतेची ही अडचण लक्षात घेता यंदाच्या हंगामात मॉन्सूनपूर्व लागवडीखालील क्षेत्र कमी राहण्याची देखील शक्‍यता वर्तविली जात आहे.

असे राहील क्षेत्र (हेक्‍टरमध्ये)

कपाशी २ लाख २४ हजार

सोयाबीन १ लाख ३५ हजार ८५०

तूर ६५ हजार ५००

ज्वारी पाच हजार

भुईमूग ५००

मका ५००

मूग ५००

उडीद ५००

तीळ ४०

अशी आहे बियाणे

व खत मागणी (टनांत)

आर्वी ३,८७८ १३,५४५

आष्टी ३,९७१ १०,७८५

देवळी ९,८१९ १४,५४५

हिंगणघाट १२,६१९ १६,५६५

कारंजा ५,९४४ ११,०४०

समुद्रपूर १५,४६७ १५,५८५

सेलू ५,५१३ १३,२१०

वर्धा १०,८६६ १५,६३५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ativrushti Madat: अतिवृष्टीची मदत मंजूर; परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना १२८ कोटी रुपये वाटण्यास मान्यता

Wild Vegetable Festival : नैसर्गिक रानभाजी महोत्सवाने पेसा गावात निसर्गाचा सन्मान

Janjira Fort Jetty : जंजिरा जेट्टीचे काम अंतिम टप्प्यात; लवकरच खुली होणार

Crop Damage Compensation : पन्नास टक्क्यांपेक्षा जास्त पावसाच्या मंडलात भरपाईचे प्रयत्न

Crop Damage Compensation : नुकसानग्रस्त सर्व शेतकऱ्यांना मदत मिळणारच

SCROLL FOR NEXT